Home सोलापूर राजकीय हस्तक्षेपामुळे परीक्षा लांबणीवर

राजकीय हस्तक्षेपामुळे परीक्षा लांबणीवर

34
0

आशाताई बच्छाव

IMG-20230206-WA0008.jpg

राजकीय हस्तक्षेपामुळे परीक्षा लांबणीवर
युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल सोलापूर जिल्हा चीफ ब्युरो महादेव घोलप.

पुणे
चिंचवड महानगर पालिकेकडुन घेण्यात येत असलेली वर्ग ब आणि क च्या ३७५ पदभरतीसाठी साधारण ८५००० उमेद्वारांनी अर्ज केले असून ही भरती प्रक्रिया महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात पुर्ण होणार होती ; परंतु ती काही राजकीय हस्तक्षेपामुळे या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे . भरती प्रकिया लांबल्यामुळे अशा उमेदवारांनआ आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते आहे म्हणून या प्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सोमनाथ लोहार यांच्या तर्फे आतिरीक्त आयुक्त यांना भरती प्रकिया तात्काळ करावी यासाठी निवेदन देण्यात आले.
आतिरीक्त आयुक्त यांच्यांशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर पिपरी – चिंचवड महानगर पालिकेकडुन घेण्यात येत असलेल्या वर्ग ब आणि क च्या ३७५ पदभरतीसाठी साधारण मार्च – एप्रिल मद्ये टीएसएस या नामांकीत आय टी कंपनीच्या माध्यमातुन परीक्षा घेण्यात येतील , असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त यांनी दिले . यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नामदेव मांजरे देखील उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here