Home उतर महाराष्ट्र साक्री तालुक्याच्या विकासरत्न आमदार सौ,मंजुळा गावित यांच्याहस्ते मौजे आमोडे व परीसरात विविध...

साक्री तालुक्याच्या विकासरत्न आमदार सौ,मंजुळा गावित यांच्याहस्ते मौजे आमोडे व परीसरात विविध योजनांचे भुमिपुजन

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20230206-WA0022.jpg

साक्री तालुक्याच्या विकासरत्न आमदार सौ,मंजुळा गावित यांच्याहस्ते मौजे आमोडे व परीसरात विविध योजनांचे भुमिपुजन

वासखेडी/धुळे दिपक जाधव प्रतिनिधी – येथील साक्री तालुक्याचे विकासरत्न आमदार सौ,मंजुळाताई गावित व डॉ, तुळशिराम गावित यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजुर झालेल्या कामांचे मौजे आमोडे येथील कान नदीवरील 2कोटी खर्चा चे पुलाचे व भोनगाव ते आमोडे रस्त्याचे भुमिपुजन आमदार सौ,मंजुळा तुळशीराम गावित व युवानेते सागर तुळशीराम गावित यांच्या शुभहस्ते करण्यात आले,याच दिवशी त्यांनी परीसरातील दरेगाव येथे 90 लक्ष खर्च असलेले नविन पाणीपुरवठा विहीरीचे,व ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम 15 लक्ष,आणि नवेनगर येथे 12लक्ष खर्च असणाऱ्या सामाजिक सभागृहाचे भुमिपुजन देखील करण्यात आले,
मौजे आमोडे येथील लोकनियुक्त सरपंच, युवानेते मंगलदास सुर्यवंशी यांनी परीसरातील जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच,उपसरपंच,सदस्य, समाजसेवक,समाजबांधव,यांचा भव्य सत्कार करत कार्यक्रम आयोजित केला
प्रसंगी बोलतांना आमदार सौ,मंजुळाताई गावित म्हणाल्या की,आज माघ पौर्णिमा या शुभदिनी आमच्या विशेष प्रत्नातुन मंजुर केलेल्या योजनांचा विविध गावातील भुमिपुजन करतांना मनस्वी आनंद होत आहे,मी प्रत्येक गावासाठी फुल नाहीतर फूलाची पाकळी दिली आहे,मागील महिनाभरापासुन आचार संहिता असल्या कारणास्तव नियमांचे पालन करणे बंधनकारक होते,म्हणून भुमिपुजनास विलंब झाला,तालुक्यातील आमोडे ही पहीली ग्रामपंचायत आहे जी बिनविरोध आहे,याचा मला सार्थ अभिमान आहे,योजनही खुप आहेत परंतु तालुका देखील तेवढाच मोठा आहे,तुम्ही कामांची मागणी करा,मी नक्की च फुल नाहीतर फुलाची पाकळी आपणांस देईल,अशी सगळ्यांच्या साक्षीने ग्वाही देते,विकास कामांना चालना द्या हीच अपेक्षा करते,दुसऱ्या च्या हाती सत्ता नाही आमच्या हाती सत्ता आहे,कोणीही कीतीही लाली पाप दिलेत तरी त्यांना बळी पडु नका,मतदार राजाने प्रत्येक ग्रां.पं.ला उच्चशिक्षित उमेदवार निवडून दिला आहे,लोकांच्या अपेक्षा नक्कीच पुर्ण होतील यात काही शंका नाही,यावेळी त्यांनी मौजे आमोडे गावातील महादेव मंदीरासाठी 15 लक्ष व सौर पथदिव्यांसाठी भरीव निधी देखील दिला,गावातील महिला ,भगिनींच्या मागणी नुसार अंबिका माता मुर्ती साठी 51हजार रू देणगी देखील प्रधान केली,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री पंचायत समिती सभापती शांताराम कुवर होते,प्रमुख पाहुणे आमदार मंजुळाताई गावित, युवानेते सागर तुळशीराम गावित, जि.प.सदस्य, खंडुशेठ कुवर,छगन राऊत,समाजसेवक गणेश गावित,परीसरातील पं.स.सदस्य, सदस्या, सरपंच,उपसरपंच आदी,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकनियुक्त सरपंच मंगलदास सुर्यवंशी, उपसरपंच संजय चौरे,पोलीस पाटील योगेश साबळे,ग्रामपंचायत सदस्य, यांचे विशेष सहकार्य लाभले आभार लोकनियुक्त सरपंच मंगलदास सुर्यवंशी यांनी मानत कार्यक्रमाचा समारोप केला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here