Home सामाजिक भिक्षेकऱ्यांचा दाता– डॉक्टर अभिजीत सोनवणे

भिक्षेकऱ्यांचा दाता– डॉक्टर अभिजीत सोनवणे

34
0

आशाताई बच्छाव

1000266406.jpg

भिक्षेकऱ्यांचा दाता– डॉक्टर अभिजीत सोनवणे

स्थिरता, संयम, अखंडता याच उपाधीने अविरत सेवा करणारे डॉक्टर म्हणजे दिव्यत्वाची अनुभूती

पाहिले न मी तुला तू मला न पाहिले…. होते ना असे?अनेकदा एखाद्या व्यक्तीला आपण उभ्या आयुष्यात भेटलो नसतो पण त्याचा आवाज, त्याचे कार्य व त्याचे कर्तृत्व याचे ऋणानुबंध जुळत असतात. असेच एक माझे बंधुत्व, वैचारिक, सामाजिक सहकारी ज्यांना आपण बरेच जण फेसबुकच्या माध्यमातून Doctor for Beggars….म्हणून ओळखत असाल. गेल्या अनेक वर्षापासून पुण्यात भिक्षेकरांचे डॉक्टर म्हणून ते कार्यरत आहेत सेवा ही सत्कर्म अक्षरशा दृष्टीहीन ,दिव्यांग, भिक्षेकरी,व्यथित एकाकी आयुष्य काढणारे असे भिक्षेकरी तुम्ही अन मी बघत असतो कधी दृष्टि ने कधी दृष्टिहीन होऊन ज्याशी नाही पंख पाय त्यांने करावे ते काय…तात्काळ दृष्टि बंद करून ही नाव समोर येत डॉक्टर अभिजीत सोनवणे सोहम ट्रस्ट यांचेच. एका इंटरनॅशनल संस्थेत महाराष्ट्र प्रमुख म्हणून कार्यरत असताना लाखोंच्या पटीतला पगार असूनही एक गरजवंत वृद्धांची सेवा डॉक्टरच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली.आपल्या नित्य सेवेसह यांचे मायबाप बनून कार्य आरंभले सुरवातीला माणूस म्हणून हेटाळणी ,मुर्खपणावर हास्य झालेच की पण सेवेला मोल नसत असते ती दुवा आणि भरपूर आशीर्वाद आणि आज सर्वत्र भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत.भिकारी? असा संभ्रम तुमच्या मनात येईल इथे दारिद्र्य,गरीब असे ही म्हणू शकत होते पण तरीही भिकारी भिक्षेकरीच का? तर गरीब दारिद्र्य कोण याची व्याख्या सरकारलाही करायला जमले नाही अगदी सुटा बुटातील देखील आज शासनाच्या योजनांचा लाभ घेतांना दिसतात मग ते गरीब म्हणावे का? भिकारी म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठ झुंजणारे कुठेतरी शारीरिक विकलांग अगदी घाणीच्या उकिरड्यावर दिसणारे आणि त्यांना पाहून आपण नाकतोंड मुरडत फक्त उपदेशाचे डोस पाजणारे अशा भिक्षेकऱ्यांचा दाता म्हणजे डॉक्टर अभिषेक. खरंतर अभिजीत म्हणजे स्थिरता, संयम, अखंडता याच उपाधीने अविरत सेवा करणारे डॉक्टर म्हणजे दिव्यत्वाची अनुभूती येते. कधीही फोन वर बोलणं झालं की ताई तुम्ही पुण्याला नगर मार्गे येताना मग येताना पुण्यात वळणाची वाट करून आधी या भावाला भेटायचं मगच पुढे जायचं एवढं मायने हक्काने सांगणार नातं. कोणीही पाठीवर कौतुकाची थाप दिली की हक्काने आधी ताईला सांगणारे असे ऋणानुबंध असणारे डॉक्टर अभिजीत यांना नुकताच Zee टीव्हीचा नॅशनल अवार्ड जाहीर झाला. यातही ताई हा माझा नाही आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे इतक्या नम्रतेने व्यक्त होणारे अभिजीत एक व्यक्ती म्हणून नाही तर व्यक्तिमत्त्व म्हणून समाजापुढे आदर्श आहेत. सण नाही, उत्सव नाही, रात्र अपरात्र फक्त सेवा करणारे डॉक्टर एक कुटुंब वत्सल तर आहेच त्यांच्या अर्धांगिनी मनीषा ताई या देखील सातत्याने या ध्येय पुर्ण कार्यासाठी झटत असतात डॉ अतिशय उत्तम लेखक आहेत “हडळ” ही डॉक्टरांची अप्रतिम रचना शब्दन शब्द भीतीदायक, भयावह,थरकाप उडवणारी रचना पण पुन्हा माणूसपणावर येऊन स्थिर होते. या जन्मात माणूस म्हणून जन्माला आलात पण पुढील जन्मात माणूस सोडून काय बनायला आवडेल विचारल्यावर आयुष्याची गाथा त्यांनी मांडली. भिक्षेकरांच्या नेमक्या समस्या शोधून त्यावर वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून संवाद त्यांचा परकेपणा घालून अगदी त्यांच्या ताटात त्यांच्याबरोबर मायेचा घास घेणारे त्यांचा परकेपणा घालवणारे डॉक्टर त्यांचे होऊन जातात अनेक छोटे मोठे व्यवसाय त्यांना देऊन सन्मानाचे आयुष्य त्यांनी दिले आहे.लेख प्रपंच झाल्यावर अनेक प्रश्न मनात रुंजी घालतील असे भिक्षेकरी आपल्या अवती भोवती आहेत का? असतील ही आपण सर्वांनी भिक्षेकरी नाही तर कष्टकरी होऊन गावकरी म्हणून जगण्यासाठी अशा भिक्षेकरींना साथ दिली पाहिजे या अध्यायनावर कार्य करणे गरजेचे आहे. कोणाच्याही आत्मप्रतिष्ठेला धक्का पोहचू न देता भीक नको पण शीक बाई शिक, अन्नपूर्णा, पावसाळ्यात रेनकोट छत्री हिवाळ्यात उबदार सेवा वैद्यकीय सेवेसह मूलभूत गरजा एक ना अनेक सेवा उपक्रमातून आपणही त्यांना मायेचा आधार देऊ शकतो. दगड एकदाच मंदिरात जातो आणि देव होतो…. आपण रोजच मंदिरात जातो तरीही दगडच राहतो… आपल्याला देव व्हायचंच नाही.. आयुष्यात कधीतरी एकदा फक्त एकदाच माणूस होऊन बघूया का.?

सौ स्मिता शेखर कुलकर्णी
विश्वस्त ब्राह्मण महासंघ.

Previous articleनांदेड लोकसभेसाठी 66 पैकी एका पात्र उमेदवाराची माघार ;
Next articleपरस्‍पराच्‍या सण- उत्‍सवात सहभागी होवून सर्वांचा आनंद द्विगुणित करु या -जिल्‍हाधिकारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here