Home अमरावती भातकूली नगरपंचायत हद्दीतील येत असलेल्या चारही जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था पायाभूत सुविधांचा...

भातकूली नगरपंचायत हद्दीतील येत असलेल्या चारही जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था पायाभूत सुविधांचा अभाव / जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

43
0

आंशुराज पाटिल मुख्य कार्यालय

IMG-20231007-WA0031.jpg

भातकूली नगरपंचायत हद्दीतील येत असलेल्या चारही जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था

पायाभूत सुविधांचा अभाव / जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र  प्रतिनिधी धनराज खर्चान

भातकूली- अमरावती जिल्ह्यातील भातकूली नगरपंचायत हद्दीतील चारही जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था झालेली आहे.
शाळा म्हटले की या पिढीचे भविष्य घडतं ते भविष्य आता अंधारात आलेले कारण शाळेला पायाभूत सुविधा अभाव पाहायला मिळत आहे.शाळेमध्ये शौचालय, पाण्याची टाकी नाही, शाळेवरील जे टिन आहेत त्याला छिद पडलेली आहे, किचन शेड, वॉल कंपाऊंड भिंत नाही,अँड्रॉइड टिव्ही,हांडवॉश स्टेशन इतकेच नव्हे तर शाळेच्या मुख्य भीतीनं तळे गेले आहे,एकूणच शाळेची अवस्था पाहता शाळकरी विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्याचा हेड मूळ याला जबाबदार कोण असा प्रश्न पालकांना पडला आहे आमच्या प्रतिनिधी ने नगरपंचायत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की शाळा नगरपंचायत कडे वर्ग करण्यात आली नाही,तसेच शाळेतील मुख्याध्यापक यांनी जिल्हा परिषद कडे पत्र व्यवहार करून सुद्धा शाळेतील पायाभूत सुविधांचा अभाव पूर्ण करण्यात आला नाही. एकूणच नगरपंचायत प्रशासन असो किंवा जिल्हा परिषद असो यांच्या हलगर्जीपणामुळे शाळेची अवस्था झाली आहे त्यामुळे शाळेची दुरुस्ती करणे फार महत्त्वाचे आहे.पण केव्हा दुरुस्ती होणार किंवा पायाभूत सुविधा केव्हा मिळणार असा प्रश्न पालकांना पडला.त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन नेमक लक्ष कधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया –
येथील जिल्हा परिषद चारही शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी आवश्यक ते साहित्य नाही,शौचालय नाही यासह पायाभूत सुविधा नाही त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी लवकरात लवकर जिल्हा परिषद प्रशासनाने या चारही शाळांकडे लक्ष देवून अपुऱ्या असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या.अशी सर्व पालकांनी मागणी आहे

पालक- दिनेश खेडकर ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य

Previous article१२ आँक्टोबर मालेगाव तहसिल कार्यालयात जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव
Next articleखाजगी यंत्रणेमार्फत केल्या जाणाऱ्या नोकर भरती विरोधात रिपाईचा आठवड्याचा हिरो प्रशासनाला दिले निवेदन:
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here