Home मुंबई अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ अप्पासाहेब पवार कालवश.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ अप्पासाहेब पवार कालवश.

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20230208-WA0000.jpg

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ अप्पासाहेब पवार कालवश.

मुंबई: ( विजय पवार )
अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष तसेच मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने झडपड करणारे ज्येष्ठ नेते शशिकांत पवार (८२) यांचे आज कोकणातून परत येताना संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते अशी त्यांची ओळख असली तरी बहुजनांची नेहमी बाजू घेणारे अशीही त्यांची ख्याती होती.

रत्नागिरी मराठा बिझनेसमेन फोरमच्या बैठकीसाठी ते परवा मुंबईहून तेथे गेले होते. आज संध्याकाळी तेथून परत येताना वाटेतच त्यांना पाली परीसरात हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेच खोपोली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्यामागे पत्नी तसेच वीरेंद्र व योगेश पवार हे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मराठा आरक्षणाचा विषयातील गुंतागुंत पाहून तो विषय लांबत असल्याने मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मताचे ते होते. त्यासाठी या वयातही आंदोलन केले व आंदोलन प्रखर करण्याचा इरादा त्यांनी यापूर्वीच जाहीर केला होता. मराठा महासंघाच्या निवडणुका सध्या सुरु असून त्यासाठी त्यांनी त्यात मार्गदर्शन केले होते.व सक्रिय सहभाग घेतला होता.. मराठा महासंघात दोन वर्षांपूर्वी फूट पडल्याने त्यांना मोठा मनस्ताप झाला होता. त्या मुळे ते सतत विवंचनेत होते.मात्र त्यातूनही सावरून पुन्हा त्यांनी संघटना बांधणीचे काम सुरु केले होते.

कट्टर मराठा नेते असले तरी अन्य समाजांबरोबर त्यांनी समन्वयाची भूमिकाही घेतली होती. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे नेते अशी त्यांची ख्याती होती. काही महिन्यांपूर्वी राज्यातील काही नेत्यांनी महापुरुषांबाबत अनुदार उद्गार काढल्यामुळे वादंग झाला होता. त्यावेळीही त्यांनी या विधानांचा निषेध करताना सर्व जातींसंदर्भात समतोल भूमिका घेतली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबत त्यांनी घेतलेल्या समन्वयाच्या भूमिकेमुळे त्यांना नंतर राज्य सरकारने दलितमित्र पुरस्कारही दिला होता.

शाहू महाराज, महाराजा गायकवाड आदींच्या पुढाकाराने सन १९०० च्या आसपास क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ही संस्था सुरु झाली. १९८१ मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ असे तिचे नाव बदलण्यात आले. मात्र त्यापूर्वीपासून म्हणजे सुमारे १९६४ पासूनच पवार हे संस्थेत काम करीत होते. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर १९९० च्या आसपास पवार यांनीच संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर या संस्थेमार्फतही त्यांनी १९८० पासून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले होते. या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते.

आपली वकिली आणि व्यवसाय सोडून पवार यांनी समाजाच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले व अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था नावारुपाला आणली. आरक्षणाच्या चळवळीत काहीकाळ अण्णासाहेब पाटील त्यांच्याबरोबर होते. सर्व मराठा उद्योजकांच्या मराठा बिझनेसमेन फोरम या संस्थेचा पसाराही त्यांनीच वाढविला. देशभरातील क्षत्रियांच्या अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संस्थेचे ते राज्य अध्यक्ष होते. त्यांनी गावदेवीला शारदा शिक्षण सेवा समितीची स्थापना करून त्यामार्फतही शैक्षणिक कार्य केले होते. त्याच्या निधनाने मराठा चळवळीतील एक हुशार व संयमी नेता गमावला आहे.

Previous articleसाक्री तालुक्याच्या विकासरत्न आमदार सौ,मंजुळा गावित यांच्याहस्ते मौजे आमोडे व परीसरात विविध योजनांचे भुमिपुजन
Next articleसांगवी फाटयाजवळ एसटी बसला अपघात २७ प्रवासी जखमी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here