Home जालना मेडिकल कॉलेजसाठी निश्चित केलेल्या जागेचा तिढा तात्काळ मार्गी लावा – आ.कैलास गोरंटयाल

मेडिकल कॉलेजसाठी निश्चित केलेल्या जागेचा तिढा तात्काळ मार्गी लावा – आ.कैलास गोरंटयाल

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20231214_064319.jpg

मेडिकल कॉलेजसाठी निश्चित केलेल्या जागेचा तिढा तात्काळ मार्गी लावा – आ.कैलास गोरंटयाल
—————————————-
विधिमंडळाच्या अधिवेशनात वेधले लक्ष @ पदांच्या निर्मितीसह हॉस्पिटल हस्तांतर करण्याची मागणी
—————————————-
जालना(दिलीप बोंडे)जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचा तिढा त्वरित मार्गी लावण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत,महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक त्या पदांची निर्मिती करून अपेक्षित असलेला निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून काल सोमवारी पुरवणी मागण्यांवर जालन्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसह येणाऱ्या अडचणी,पदनिर्मिती,अपेक्षित निधी आदी मुद्दे अत्यंत प्रभावीपणे मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. ” उनको देख के आजाती हैं मुपे रौनक ! उनको लगता है बिमार का हाल अच्छा है !! असा खास शेर सभागृहात सादर करून आ.कैलास गोरंटयाल यांनी जालना येथील मंजूर असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागे संदर्भात प्रशासकीय पातळीवर येत असलेल्या अडचणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले.ते म्हणाले की,जालना येथे राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले,अधिष्ठाता(डीन) यांची नियुक्ती केली,मात्र,प्रशासकीय पातळीवर अत्यंत छोट्या छोट्या त्रूट्यांमुळे जागेचा तिढा कायम आहे.जागेच्या संदर्भात असलेल्या त्रुट्या वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गांभीर्याने लक्ष घालून दूर कराव्यात अशी अपेक्षा आ.कैलास गोरंटयाल यांनी यावेळी व्यक्त केली.

Previous articleपारंपारिक कारागिरांनी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजनेचा लाभ घ्यावा-  सतीश घाटगे  
Next articleमहात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये असलेल्या आरोग्य मित्रांना 25 हजारांची वेतनवाढ करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here