• Home
  • बालेवाडीतील वाईन शॉपच्या मालकाला कोरोनाची लागण⭕

बालेवाडीतील वाईन शॉपच्या मालकाला कोरोनाची लागण⭕

 

⭕बालेवाडीतील वाईन शॉपच्या मालकाला कोरोनाची लागण⭕
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :- बाणेर बालेवाडी येतील वाईन शॉपच्या मालकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील कामगारांची सुध्दा तपासणी केली आहे. १६ कर्मचार्‍यांच्या घश्यातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

शिवाजीनगर भागात राहणार्‍या एका व्यावसायिकाची बाणेर आणि बालेवाडी भागात दोन वाईन शॉपची दुकाने आहेत. अन्य कोरोना बाधिताच्या संपर्कात हे आल्यामुळे या मालकांची माहिती घेण्यात आली. दररोज ही व्यक्ती वाईन शॉपमध्ये जात असल्यामुळे येथील काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे सुध्दा नमुने घेण्यात आले आहेत. एका मालकाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लॉकडाऊन तीनच्या दरम्यान राज्यशासाने मद्य विक्रीला परवाणगी दिले आहे. त्यामुळे शहरात देशी दारु, विदेशी दारु, बिअर आणि वाईन अशी १८२ दुकानांना मद्यविक्रीला परवाणगी देण्यात आली आहे. शहरात १३ मे २०२० पासून दारुची दुकाने खुली करण्यात आली आहेत. सुरुवातीला दारुच्या दुकानांवर मोठी गर्दी होत असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संकेतस्थळावर नोंदणी करुन टोकन देण्यास सुरुवात केली. या प्रणालीला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. घरपोहच दारु विक्रीची प्रणाली सुध्दा सुरु करण्यात आली आहे. जिल्हयात ६१६ दुकाने आहेत मात्र घरपोहच मद्य विक्रीसाठी केवळ दहाच दुकानांनी नोंदणी केली आहे…

anews Banner

Leave A Comment