Home पुणे व्यापाऱ्याकडे सापडला सात लाखांचा बेकायदा गुटखा आणि विदेशी सिगारेट….! 🛑

व्यापाऱ्याकडे सापडला सात लाखांचा बेकायदा गुटखा आणि विदेशी सिगारेट….! 🛑

90
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 व्यापाऱ्याकडे सापडला सात लाखांचा बेकायदा गुटखा आणि विदेशी सिगारेट….! 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे/दौंड :- ⭕पोलिसांनी अधिक माहिती दिली.
कमलेश मुरली कृपलानी ( रा.दौंड भैरोबा मंदिर जवळ ) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांना माहिती मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून कारवाईसाठी तैनात केले‌. या पथकाने कमलेश कृपलानी हा आपल्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या गाळ्यामध्ये बेकायदा विनापरवाना गुटका व विदेशी सिगारेट असा माल साठवण करून त्याची आपल्या ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.

या ठिकाणी छापा घातला असता तेथे तब्बल सात लाख रुपये किमतीचा गुटखा आणि सिगारेट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कमलेश मुरली कृपलानी याच्यावर अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम तसेच सिगारेट व तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण) या कायद्यांतर्गत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास हा फौजदार भगवान पालवे करत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख , बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे, विजय वाघमारे, अंमलदार शरद वारे, विशाल जावळे, किरण ढुके, जब्बार सय्यद, योगेश गोलांडे, आप्पा वाकळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 🛑

Previous articleउरळगाव येथे तात्काळ १२० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले
Next articleमनसेचे रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस संदिप फडकले येत्या काही दिवसात उग्र आंदोलन छेडनार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here