• Home
  • शरद पवार रायगडकडे रवाना

शरद पवार रायगडकडे रवाना

🛑 शरद पवार रायगडकडे रवाना 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 9 जून : ⭕ निसर्ग चक्रीवादळाचा फटका कोकणातील विविध जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणवर बसला आहे. असंख्य नागरिकांचे या चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यासाठी आज सकाळी ते रायगडसाठी रवाना झाले आहेत.

असा असेल दौरा :-
➡️ सकाळी 8.30 वा. मुंबईहून रायगडकडं प्रयाण.
➡️ सकाळी 11.30 वा. माणगावला भेट.
➡️ दुपारी 12.30 वा. म्हसळा दौरा.
➡️ दुपारी 1 वा. दिवेआगारचा आढावा.
➡️ दुपारी 2 वा. श्रीवर्धनची पाहणी.
➡️ दुपारी 4 वा. श्रीवर्धनमध्ये खासदार,आमदार अधिकाऱ्यांसोबत बैठक
संध्या. 5 वा. हरिहरेश्वरच्या नुकसानीची पाहणी
संध्या. 6 वा. बागमांडला मार्गे दापोलीला रवाना
पवारांचा आजचा मुक्काम दापोलीत.

बुधवार, 10 जून रत्नागिरी दौरा
रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानीची ते पाहणी करतील. दापोलीतील नुकसानीची पाहणी केल्यानंतर रत्नागिरीतील काही गावांना ते भेटी देऊन येथील स्थानिकांशी चर्चा करतील. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment