Home सांस्कृतिक दुनियादारी ‘ फेम अंकुश चौधरी आणि दिपा परब यांची प्रेमकथा

दुनियादारी ‘ फेम अंकुश चौधरी आणि दिपा परब यांची प्रेमकथा

136
0

🛑 ‘दुनियादारी ‘ फेम अंकुश चौधरी आणि दिपा परब यांची
प्रेमकथा 🛑
⭕ मराठी चित्रपटसृष्टी ⭕
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :✍️⭕ मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले. अंकुशची पत्नी दिपा परब ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अंकुश आणि दिपाने 2007 साली लग्न केले. ते दोघे त्यांच्या संसारात प्रचंड खूश असून त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे. अंकुश आणि दिपा यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांनी तब्बल दहा वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.

दिपा आणि अंकुश यांचा २३ नोव्हेंबर 2006 रोजी साखरपुडा पार पडला. अंकुश आणि दिपा या दोघांनीही त्यांचा साखरपुडा झाल्याचे सगळ्यांपासून लपवून ठेवले होते.
मीडियाला देखील याविषयी अनेक दिवसांनंतर कळले.
अंकुश आणि दिपा एकमेकांना कॉलेज दिवसांपासून ओळखत होते. ते दोघे एमडी म्हणजे महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी. त्या दोघांचं प्रेम एकच आणि ते म्हणजे अभिनय आणि रंगभूमी. कॉलेजमध्ये असताना ते दोघेही एकांकिकामध्ये काम करत असत. त्याचदरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. करियर केल्यानंतरच लग्न करायचे त्यांनी ठरवले होते. अभिनय क्षेत्रात नाव कमावल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अंकुश चौधरी, केदार शिंदे आणि भरत जाधव ही तेव्हाची लोकप्रिय तिकडी. केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे. त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
तसेच दिपाचा प्रसाद ओक आणि सुबोध भावे सोबतचा क्षण हा सिनेमा अधिक लोकप्रिय ठरला. अंकुशने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट देत तो सुपरस्टार बनला. दिपा लग्नानंतर खूपच कमी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. शेवटची ती अंड्याचा फंडा या चित्रपटात झळकली होती.⭕

Previous articleअखेर ‘त्या’ गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूच खर कारण आल समोर…
Next articleशरद पवार रायगडकडे रवाना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here