• Home
  • अखेर ‘त्या’ गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूच खर कारण आल समोर…

अखेर ‘त्या’ गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूच खर कारण आल समोर…

🛑 अखेर ‘त्या’ गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूच खर कारण आल समोर… 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 9 जून : ⭕ केरळमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच फटाक्याने भरलेलं अननस खाल्ल्याने एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्याची अमानवीय घटना घडली होती. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली होती. सोशल मिडीयावर याचे पडसाद उमटले होते. केरळ नागरिकांवर टीका होत, आरोपींना कठोरात शिक्षा देण्याची मागणी जोर धरत होती. मात्र आतापर्यत आपण जे एकल ते अर्धसत्य होत, आता खर कारण समोर आले आहे.

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीनं फटाके भरलेलं अननस खाल्लं होते. मात्र हे अननस तोंडात फुटल्यानं ती गंभीर जखमी झाली होती. जवळपास तीन दिवस ती वेल्लियार नदीत विव्हळत पडली होती. २७ मे रोजी तिने या नदीत प्राण सोडले होते. या घटनेने संपूर्ण देश संतापला होता. सोशल मिडीयावर सुद्धा केरळ नागरिकांवर टीका होत, आरोपींवर कारवाईची मागणीही जोर धरत होती.

या घटनेच्या तपासावर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ट्विट करून आता माहिती दिली आहे. स्थानिक लोक रानडुकरांना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी स्फोटकं भरलेली फळ पेरून ठेवतात. हेच फळ हत्तीणीनं चुकीनं खाल्लं असावं, असं दिसून आलं आहे. तसेच या घटनेतील आरोपींना अटक करावी. तसेच ज्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हत्तीणीचा मृत्यू झाला, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात विस्तृत सूचना दिल्या आहेत.दरम्यान, हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी केरळ सरकारनं कारवाई केली असून, काही आरोपींनाही ताब्यात घेतलं आहे.⭕

anews Banner

Leave A Comment