Home युवा मराठा विशेष डिजिटल एज्युकेशन’ कागदावरच

डिजिटल एज्युकेशन’ कागदावरच

123
0

🛑 ‘डिजिटल एज्युकेशन’ कागदावरच 🛑
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे : ⭕ पुणे महापालिका आणि पुणे स्मार्ट सिटी कंपनी यांच्यातील शीतयुद्धात ‘डिजिटल एज्युकेशन सिस्टिम’ या महत्त्वाकांक्षी ऑानलाइन शिक्षणाच्या प्रकल्पाचा (डीईएस) बळी गेला आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रणालीची राज्यभरातील विद्यार्थ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे स्मार्ट सिटी कंपनीने डिसेंबर २०१७मध्ये राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून ‘डिजिटल एज्युकेशन सिस्टिम’ हा प्रकल्प हाती घेतला होता. ‘बालभारती’ आणि शालेय शिक्षण विभागाच्या मदतीने मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत ‘ई-लर्निंग’चा अभ्यासक्रम तयार करणे, शिक्षण आणि वैयक्तिक शिक्षकांसाठी त्याचा वापर करणे या हेतूने हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मोबाइल, टॅब, कम्युटर, टीव्ही, अन्य कोणतेही डिजिटल डिव्हाइस किंवा प्लॅटफॉर्मचा वापर करून शिक्षण घेता येणे, हा या प्रणालीचा मुख्य हेतू होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विद्यार्थ्यांना या निमित्ताने तयार आणि मोफत ‘ई-लर्निंग’ अभ्यासक्रम आवश्यक ठरला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची चर्चा पुढे आली, तेव्हा तो प्रशासकीय वादात रखडल्याचे समोर आले.

प्रकल्पावर पालिकेचा आक्षेप

स्मार्ट सिटी कंपनीने औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरातील तीन शाळांमध्ये या प्रकल्पाची चाचणी गेल्या वर्षी सुरू केली होती. तसेच, हा प्रकल्प महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली होती. गेल्या काही वर्षांत महापालिका शाळांमध्ये डिजिटल टीव्ही, कम्पुटरची खरेदी करण्यात आली आहे. उपलब्ध ‘हार्डवेअर’च्या मदतीने या शाळांमध्ये ‘ई लर्निंग’चा प्रकल्प राबविण्याची योजना होती. त्याच काळात महापालिकेनेही शाळांमध्ये ई-लर्निंग प्रकल्प राबविण्याची जोरदार तयारी सुरू केली. यामुळे स्मार्ट सिटी कंपनीच्या या प्रकल्पावर आक्षेप घेत महापालिकेने द्विरुक्ती टाळण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीचा प्रकल्प थांबविण्याची लेखी सूचना केली होती. स्मार्ट सिटी कंपनीने याबाबत गेल्या वर्षी ७ ऑगस्टला दोन्ही प्रकल्प भिन्न असल्याचे सांगितले होते.

दोन संस्थांमधील शीतयुद्ध

स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकांमध्ये पुणे महापालिकेच्या आयुक्तांसह सर्वच पदाधिकारी संचालक म्हणून नियुक्त आहेत. स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी एकच असले, तरी या संस्थांमधील शीतयुद्ध गेल्या दोन वर्षांत सातत्याने पुणेकरांना पाहायला मिळाले आहे. त्यातच ‘डिजिटल एज्युकेशन सिस्टिम’चा बळी गेला आहे. महापालिकेच्या आग्रहावरून दोन्हीकडील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून, या प्रकल्पांबाबत चौकशी करण्यात आली. दक्षता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला असून, त्यामध्ये महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांचे प्रकल्प वेगवेगळे असल्याचे स्पष्ट केले आहे.

चौकशी समितीने उपस्थित केलेल मुद्दे

➡️ ‘डीईएस’ ही वर्गशिक्षण आणि वैयक्तिक शिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षण प्रणाली.

➡️ या प्रणालीचा वापर कोणत्याही डिव्हाइसच्या माध्यमातून करणे शक्य.

➡️ ‘डीईएस’ प्रणालीचे इंटेक्चुअल प्रॉपर्टी राइट हे स्मार्ट सिटी कंपनीचे असल्याने भविष्यातील खर्चात बचत.

➡️ महापालिकेचा ई-लर्निंग आणि स्मार्ट सिटी कंपनीचा प्रकल्प भिन्न असून, त्यांचा उद्देश, व्याप्ती आणि फलनिष्पत्ती भिन्न आहे.

Previous articleरुग्णसेवेचे समाधान अमूल्य
Next articleअखेर ‘त्या’ गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूच खर कारण आल समोर…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here