Home Breaking News परभणी जिल्हा रूग्णालयातुन कोरोनामुक्त १२ व्यक्तींना मिळाली सुट्टी तर जिल्हात एकुण 2483...

परभणी जिल्हा रूग्णालयातुन कोरोनामुक्त १२ व्यक्तींना मिळाली सुट्टी तर जिल्हात एकुण 2483 संशयित रूग्णांची नोंद

220

*परभणी जिल्हा रूग्णालयातुन कोरोनामुक्त १२ व्यक्तींना मिळाली सुट्टी तर जिल्हात एकुण 2483 संशयित रूग्णांची नोंद*
*विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे*
परभणी येथुन दि. ८ रोजी जिल्हा रुग्णालयातून एकूण 12 कोरोना बाधित रुग्णांना कसलीही कोरोना बाधितपणाची लक्षणे नसल्याने तसेच त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने राज्य स्तरावरील प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधितांना रुग्णालयातून सोमवार दि. 8 जून 2020 रोजी सुट्टी देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये पूर्णा येथील एक मुलगी व दोन मुले आणि पूर्णा ग्रामीण भागातील माटेगाव येथील तीन स्त्रिया व तीन पुरुष यांचा समावेश आहे. तर गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील एक पुरुष व दोन स्त्रियांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात सोमवार दि. 8 जून 2020 रोजी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे 2 हजार 479 व आज रोजी दाखल झालेले 4 असे एकूण 2 हजार 483 संशयित व्यक्तींची नोंद झालेली आहे. असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Previous articleशरद पवार रायगडकडे रवाना
Next articleमालेगांवात कोरोना बाबत नागरिकांची स्क्रिलींग तपासणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.