*मालेगांवात कोरोना बाबत नागरिकांची स्क्रिलींग तपासणी*
मालेगांव,( सतिश घेवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- कोरोनासारख्या महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मालेगांव शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांनी रचनानगर भागात नागरिकांची कोरोनाची आरोग्य स्क्रिलिंग तपासणी करुन घेतली.
मालेगांव शहरातील विविध भागात अजूनही कोरोनाबाधित रुग्ण आढळतच असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्या अनुषंगाने नागरिकात जागृतता निर्माण होऊन कोरोना बाबतची भिती कमी व्हावी म्हणून हि आरोग्य स्क्रिलिंग तपासणी करण्यात आली.यावेळी “युवा मराठा”चे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत व कँमेरामन सुनील मिस्तरी यांनी आपली स्वतः ची आरोग्य स्क्रिलिंग तपासणी करुन घेतली.यावेळी दिनेश साबणे,भारत लाडके, व रचनानगर परिसरातील असंख्य नागरिक व महिला वर्ग उपस्थित होता.
