Home नांदेड आझाद ग्रुपच्या देगलूर शहर अध्यक्ष पदी संतोष मंनधरणे यांची निवड

आझाद ग्रुपच्या देगलूर शहर अध्यक्ष पदी संतोष मंनधरणे यांची निवड

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20220927-WA0033.jpg

आझाद ग्रुपच्या देगलूर शहर अध्यक्ष पदी संतोष मंनधरणे यांची निवड

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर:नांदेड येथील हाॅटेल गणराज पॅलेसच्या सभागृहात दि. २५ सप्टेंबर रोजी आझाद ग्रुपच्या नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सोहळा व पद नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे होते तर प्रमुख उपस्थिती आझाद ग्रुपचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद टाले पाटील, राज्य कार्याध्यक्ष अली फराज रिजवी, राज्य संघटक उध्दव जाधव, मराठवाडा संघटक तथा लांडगेवाडीचे सरपंच बाळासाहेब टोपारे, विनोद पाटील गवते , प्रदेश प्रवक्ते मारोती पाटील बुद्रुक, राज्य कार्यकारिणी सदस्य जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे , जिल्हाध्यक्ष बसवंत पाटील शेळगावकर, नामदेव रहाटकर ,एस व्ही.पांडागळे प्रसाद पोले, रूद्रा पाटील भोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी संतोष मंनधरणे यांना सर्व मान्यवरांचे हास्ते देगलूर शहर अध्यक्ष पदाच नियुक्ती पत्र देण्यात आले तसेच उपाध्यक्ष म्हणून ईश्वर देशमुख शहर सचिव वैजनाथ स्वामी शहर कोषाध्यक्ष शिवराज चेडके शहर संपर्क प्रमुख अमोल शिंदे शहर प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत गजलवार शहर संघटक मल्लिकार्जुन कडलवार
शहर सहसचिव आनंद पटणे शहर कार्याध्यक्ष चंद्रशेखर पनतूवार शहर सहकार्य अध्यक्ष राजू स्वामी अशी देगलूर शहर कारणी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना भीमाशंकर मामा कापसे म्हणाले की, आझाद ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देत आहोत . महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. महिलांना सुध्दा सन्मान मिळावा यासाठी आझाद ग्रुपचे ध्येय उदिष्ट आहेत..
लोकांनी मला विचारले की, राजकारणात पडणार आहात काय निवडणूक लढवणार आहात काय . एकीकडे आम्ही म्हणतो राजकारणात पडायचे नाही निवडणूक लढवायची नाही पण आमच्या आझाद ग्रुपचे मराठवाडा संघटक बाळासाहेब टोपारे यांनी निवडणूक लढवून सरपंच झालेत . वेळ प्रसंगी आझाद ग्रुप निवडणूक ही लढविणार. निवडणूकी मध्ये पैसे घेयायचे नाहीत पैसे देयायचे नाहीत हे आपल्या आझाद ग्रुपच्या सदस्यांनी आपल्या पासुन सुरु करावे .
आझाद ग्रुपचे ब्रिद वाक्य आहे लोकहित सर्वोपरी या प्रमाणे या सर्व गोष्टी घेऊन आझाद ग्रुपचे काम करणार कुठल्याही गुंडयाला भिणार नाही . आझाद ग्रुप हे समाज हितासाठी काम करणार आहे असे भीमाशंकर मामा कापसे म्हणाले.
भीमाशंकर मामा कापसे यांनी प्रमुख मार्गदर्शन झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती चे पत्र देण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर डाकोरे यांनी केले.

Previous articleग्रामीण रुग्णालय कंधार येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानास सुरुवात
Next articleजिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ज्येष्ठासाठीचे कायदेविषयक शिबीर संपन्न…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here