Home नांदेड आमदार कै. रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र...

आमदार कै. रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र लोहगाव येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न..

101
0

राजेंद्र पाटील राऊत

आमदार कै. रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र लोहगाव येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज दिनांक 22 एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहगाव येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.आश्वासन नव्हे वचन… आमदार कै रावसाहेब अंतापुर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून प्राथमिक आरोग्य केद्र लोहगाव येथे रूग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती… पण दुर्दैवाने ते आपल्या त आज नाहीत.म्हणुण जिल्हा परिषदेच्या लोहगाव गणाचे जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम खात्याचे सभापती श्री संजय अप्पा बेळगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली देगलुर तालुक्याचे युवक नेते तथा राजकारणातील निष्कलंक चारित्र्य संपन्न युवक नेतृत्व या जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या हस्ते विधीवत पूजा करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी बिलोली तालुक्याचे नायब तहसीलदार श्री गौड साहेब. तालुका वैद्यकीय अधिकारी श्री वाडेकर साहेब काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ता ग्रामीण दिलीप पाटील पांढरे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील जाधव लोहगाव गावचे सरपंच प्रतिनिधी यादवराव कोरनुळे माजी सरपंच दत्ता पाटील पांढरे ज्येष्ठ नेते रमेश पाटील शेटकर लोहगाव चे ग्राम विकास अधिकारी यु टी. जाधव कासराळी ग्रामपंचायत सदस्य माजित सेठ शिवा पाटील दीपक संगलोड युवक नेते पप्पू फुलारी सामाजिक कार्यकर्ते संजू चरकूलवार लोहगाव येथील नवयुवक मंडळी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना सन्माननीय सभापती साहेब म्हणाले जिल्ह्याचे नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बिलोली तालुक्याचा विकासाचा वसा अंतापूरकर साहेबांनी घेतला होता तो शेवटपर्यंत आम्ही विकास करून तळागाळातील लोकांना मदत करू असे वचन दिले आणि लोहगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास साडेचार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून अजून जरी निधी लागत असला तरी तो देण्याचा प्रयत्न करू शाळा आणि दवाखाना यांच्या विकासाच्या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Previous articleनांदेडमध्ये व्रध्द महिलेस मारहाण करणाऱ्या शिवभोजन चालकांवर तात्काळ कारवाई करा – पत्रकार संरक्षण समिती
Next articleदहिवडला विलगिकरण कक्ष लोकार्पण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here