Home माझं गाव माझं गा-हाणं दहिवडला विलगिकरण कक्ष लोकार्पण

दहिवडला विलगिकरण कक्ष लोकार्पण

132
0

राजेंद्र पाटील राऊत

दहिवडला विलगिकरण कक्ष लोकार्पण
(युवराज देवरे प्रतिनिधी दहीवड)
तमाम दहिवड ता देवळा जि नाशिक येथील नागरिकांना कळकळीने कळविण्यात येते कि आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज गुरुवार दि २२/०४/२०२१ रोजी वाढत्या कोरोना संक्रमणामुळे कोव्हिड विलगिकरण कक्षाची स्थापना करण्यात येऊन आज मा नायब तहसिलदार बनसोडे सर ,मा पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर सर ,यांचे हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला आहे.सदर प्रसंगी सरपंच ,आरोग्य कर्मचारी, कवी वा गं सोनवणे सर ,तं मु अध्यक्ष गणेश देवरे ,धनदाई ट्रस्ट उपाध्यक्ष माणिक अप्पा, विद्युत कर्मचारी दिपक पवार, बापू महाजन ,तलाठी पवार तात्या ,पत्रकार विशाल सोनवणे , पत्रकार युवराज देवरे ,मनोज वैद्य सर ,गंगा खैरनार, संतोष सोनवणे, होमगार्ड कर्मचारी बेलदार ,बस्ते ,व अन्य मान्यवर शासकीय नियम नुसार हजर होते.
..सदर कोव्हिड विलगिकरण कक्षाचा हेतू असा विषद करण्यात येतो कि जो कोणी व्यक्ती कोरोना संक्रमणामुळे पाॅझिटिव्ह रूग्ण असेल तसेच त्याच्या घरातील संचारामुळे घरातील परीवारातील सदस्यांचे सुद्धा आरोग्य धोक्यात येत असते.
…. तरी घरातील वातावरण दुषीत होते त्या अनुषंगाने सदर पाॅझिटिव्ह रूग्णाच्या आरोग्यासाठी कोव्हिड विलगिकरण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. रूग्णांनी सदर ठिकाणी क्वारंटाईन होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचे करवी योग्य औषध उपचारासाठी विलगिकरण कक्षात दाखल व्हावे हि कळकळीची विनंती असे.
(सदर कार्यक्रमास ग्रामसेवक तसेच एकही ग्राम पंचायत सदस्य उपस्थित नव्हते)

Previous articleआमदार कै. रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र लोहगाव येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न..
Next articleआजपासून लागलेल्या लाँकडाऊनची सविस्तर नियमावली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here