Home नांदेड नांदेडमध्ये व्रध्द महिलेस मारहाण करणाऱ्या शिवभोजन चालकांवर तात्काळ कारवाई करा – पत्रकार...

नांदेडमध्ये व्रध्द महिलेस मारहाण करणाऱ्या शिवभोजन चालकांवर तात्काळ कारवाई करा – पत्रकार संरक्षण समिती

98
0

राजेंद्र पाटील राऊत

नांदेडमध्ये व्रध्द महिलेस मारहाण करणाऱ्या शिवभोजन चालकांवर तात्काळ कारवाई करा – पत्रकार संरक्षण समिती

राजेश एन भांगे

सध्या कोरोणा महामारीने अनेक गोरं गरीब लोकांचे बेरोजगारीने हाल बेहाल झाले असुन तीच बाब लक्षात घेऊन ठाकरे सरकारने कष्टकरी कामगार व गोरगरीब लोकांसाठी यापुढे शिवभोजन थाळी मोफत मिळणार असल्याची घोषणा केली.

तरी मात्र नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिवभोजन चावलवण्याचे काम शिवसेनेच्या पदाधिकारी ने घेऊन इतर व्यक्तीस चावण्यास दिले असून या शिवभोजनालयात स्वतंत्र स्वयंपाक ग्रह नाही व कसलीही स्वच्छता दिसुन येत नाही व तसेच याठिकाणी काही मोजक्या चे व्यक्तींना भोजन दिले जात असुन सदरील भोजनालय चालक जनतेची दिशाभूल करीत असुन या भोजनालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.

अशातच दि. २० एप्रिल रोजी एक वृद्ध महिला या शिवभोजनालयात भोजन मागण्यास गेली असता त्या गरीब वृद्ध महिलेला शिवीगाळ करत मारहाण करून माणुसकीला काळींबा फासण्याचे काम केले आहे.
तरी या प्रकरणाची चौकशी करून त्या शिवभोजन चालकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आले असुन या निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड सचिव शशिकांत गाढे आदि सदस्यांचे स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here