Home पुणे कौळाणेच्या नवविवाहित दाम्प्त्यांची पुणेत आत्महत्या सर्वत्र हळहळ

कौळाणेच्या नवविवाहित दाम्प्त्यांची पुणेत आत्महत्या सर्वत्र हळहळ

116
0

राजेंद्र पाटील राऊत

कौळाणेच्या नवविवाहित दाम्प्त्यांची
पुणेत आत्महत्या सर्वत्र हळहळ
(राजेंद्र पाटील राऊत /विलास पवार युवा मराठा न्युज नेटवर्क)
पुणे/कौळाणे (नि.) – अवघ्या चार महिन्यापुर्वीच विवाह झालेल्या नवदाम्प्त्यांने पुणे शहरात आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगांवजवळच्या कौळाणे (नि.) येथील रहिवाशी असलेल्या उखा विश्राम बच्छाव यांचा मुलगा विपूल वय २७ व सुन सौ.ऋतूंबरा वय २३ हे पुणे शहरातील घनसावंगी पोलिस स्टेशनच्या बाजूला वास्तव्यास होते.तर विपूल हा एका कंपनीत इंजीनियर पदावर कार्यरत होता अशी माहिती मिळत असून,काल दिनांक २१ एप्रिल २०२१ बुधवारी सायंकाळी साडेचार ते पावणेपाच वाजेच्या दरम्यान विपूल व सौ.ऋतुंबरा या उभयता पती पत्नीने आपल्याच घरात एकत्रितपणे आत्महत्या केलेली असल्याचे स्थानिकाच्या निर्दशनास आल्यानंतर या घटनेची माहिती विपूल व ऋतृंबरा यांच्या मुळ गावी कौळाणे येथे कळविण्यात आली.दरम्यान आमचे पुणे जिल्हा ब्युरो चीफ विलास पवार यांनी कळविल्यानुसार सदरच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.तर कौळाणे गावावर या घटनेमुळे शोककळा पसरलेली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous articleठेंगोडा येथे घरफोडी अडीच लाखाचा माल चोरटयांनी केला लंपास..!
Next articleनांदेडमध्ये व्रध्द महिलेस मारहाण करणाऱ्या शिवभोजन चालकांवर तात्काळ कारवाई करा – पत्रकार संरक्षण समिती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here