• Home
  • *सोन्या, चांदीच्या दरात घसरण 4000 ते 12000 रूपयांची घट*

*सोन्या, चांदीच्या दरात घसरण 4000 ते 12000 रूपयांची घट*

*सोन्या, चांदीच्या दरात घसरण 4000 ते 12000 रूपयांची घट*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज)*

कोरोना लशीसंदर्भात येणारा सकारात्मक बातम्यानंतर जगभरातील शेअर बाजारात उसळी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात खरेदी वाढल्याने याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला असून दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 4 हजार रुपयांनी घसरून 51 हजार 700 रुपयांवर आले आहेत. तर चांदीतही 12000 रुपयांची घसरण झाली आहे. कोरोनच्या संकटात सोन्यात गुंतवणूक वाढल्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली.
रशियाने लशीचा दावा करताच खरेदीदरांनी विक्रीचा मारा सुरु केला व आंतरराष्ट्रीय बाजार गडगडण्यास सुरुवात झाली. यामुळे चांदीत एकाच दिवसात तब्बल बारा हजार रुपये तर सोन्यात चार हजार रुपयांची घसरण झाली.
परिणामी चांदी थेट 63 हजार रुपये प्रति किलोवर आली तर सोने 51700 रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.
कोरोनाच्या संकटात सर्वत्र आर्थिक अडचणी ओढावल्या असताना सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने चांदीत मोठी गुंतवणूक वाढली आहे. परिणामी त्यांचे भावही गगनाला भिडले. मात्र आता रशियाने कोरोना लशीची घोषणा करताच सट्टा बाजारात खरेदीदारांनी वाढविलेली खरेदी थांबवून विक्रीचा मारा सुरु केला आहे. त्यामुळे मंगळवारी 75 हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात 12 हजार रुपयांनी घसरण होऊन ती बुधवारी 63500 रुपये प्रति किलोवर आली. अशाच प्रकारे मंगळवारी 57000 रुपयांवर असलेले सोन्याच्या भावात चार हजार रुपयांनी घसरण होऊन ते 51700 रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.
एका वृत्तसंस्थेच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती 5 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात घसरल्या आहेत. या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीमध्ये सात वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरून 1921 डॉलर प्रति औंसवर पोहचल्या आहेत.

anews Banner

Leave A Comment