Home Breaking News विज बिलात ग्राहकांना सूट मिळण्याची शक्यता, मंत्रिमंडळाची आज बैठक

विज बिलात ग्राहकांना सूट मिळण्याची शक्यता, मंत्रिमंडळाची आज बैठक

128
0

विज बिलात ग्राहकांना सूट मिळण्याची शक्यता, मंत्रिमंडळाची आज बैठक

प्रतिनिधी =किरण अहिरराव युवा मराठा न्युज नेटवर्क

मुंबई : राज्यात लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मोठ्या रक्कमेची बिलं आल्याने अनेकांना शॉक बसला होता. यानंतर राज्यभरात लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. काही जणांना अंदाजे तर काही जणांना चुकीची बिलं पाठवल्याने मोठ्या प्रमाणात लोकांकडून असंतोष व्यक्त होत होता. सुधारित बिलं पाठवण्याची मागणी होत होती. महावितरण कार्यालयाच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. भाजप आणि मनसेने वीज बिलात सूट देण्याची मागणी सरकारकडे केली होती.

आज मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिलात सूट देण्यासाठीचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. युनिटच्या वापरानुसार वीज बिलात सवलत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे

१० ते ३० टक्क्यांपर्यंत वीज बिलात सवलत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऊर्जा विभाग आज मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.

राज्यात एकूण 73 लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. वीज बिलात सूट दिली गेली तर वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Previous article*सोन्या, चांदीच्या दरात घसरण 4000 ते 12000 रूपयांची घट*
Next articleराज्य मंत्रिमंडळ बैठकीतअनेक महत्वाचे निर्णय; मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्याच्या नातेवाईकाना नोकरी मिळणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here