Home Breaking News राज्य मंत्रिमंडळ बैठकीतअनेक महत्वाचे निर्णय; मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्याच्या नातेवाईकाना नोकरी मिळणार

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतअनेक महत्वाचे निर्णय; मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्याच्या नातेवाईकाना नोकरी मिळणार

89
0

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतअनेक महत्वाचे निर्णय; मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्याच्या नातेवाईकाना नोकरी मिळणार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज (12 ऑगस्ट) महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या 42 व्यक्तींच्या नातेवाईकांस एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

• सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षी एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणाच्या परिणामी बाधीत झालेल्या वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमांच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित अभ्यासक्रमाचे भरणा केलेल्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती शासनामार्फ
• कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्याचा निर्णय.

• मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय . म्हाडा अधिनियम १९७६ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.

• महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या कायम मर्यादेत तात्पुरती वाढ करण्याकरिता अधिनियमात दुरुस्ती करण्यास मान्यता.

• अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना नोव्हेंबरपर्यंत मोफत चणा डाळ

• शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टर्सचा विद्यावेतनात वाढ

• मुचकुंदी लघू पाटबंधारे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता

Previous articleविज बिलात ग्राहकांना सूट मिळण्याची शक्यता, मंत्रिमंडळाची आज बैठक
Next articleनांदेड जिल्ह्याचे खा. चिखलीकर यांची केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here