Home गडचिरोली आलापल्ली अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या-

आलापल्ली अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या-

246

आशाताई बच्छाव

IMG-20230614-WA0035.jpg

आलापल्ली अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या-

भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांची मागणी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :- 
एटापल्ली तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर आलापल्ली येथे झालेल्या अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास करून यात दोषी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केली आहे.

शालेय कामानिमित्त आल्लापल्ली येथे गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे या दोन नराधमांनी तिला दारू पाजून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला हा अत्यंत संतापजनक प्रकार असून ही अतिशय निंदनीय घटना आहे. जिल्ह्यातील आदिवासी मुलींवर अत्याचाराचे कृत्य सातत्याने घडत आहेत ही बाब अतिशय गंभीर असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून पोलिस विभागाने अशा अमानवीय कृत्य करणाऱ्या दोन्ही दोषींवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून कठोर शिक्षा देण्याची मागणी भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केली आहे.

Previous articleचामोर्शी बस स्थानकाचे बांधकाम गतीने पूर्ण करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleगडचिरोली – चिमूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार – शरद पवार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.