Home गडचिरोली गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार – शरद पवार

गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार – शरद पवार

171
0

आशाताई बच्छाव

IMG-20230614-WA0032.jpg

गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार – शरद पवार                 गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सदर्भात महाविकास ने राज्यांतील 48 लोकसभा शेत्र व उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने आज दी. 14 जुन रोजी मुबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरद पवार याच्या अध्यक्षतेखाली, जयंत पाटील, प्रफुल्ल भाई पटेल, अजित दादा पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, राजेश टोपे,अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, प्राजक्त तनपुरे, महेबुब शेख यांच्या उपस्थित झालेल्या महत्वाच्या बैठकीत गडचिरोली लोकसभे सदरर्भा सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठकिकरीता गडचिरोली जिल्हातील प्रमुख नेते व पदाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व बर्मपूरी विधानसभेत प्रमुख नेते व पदाधिकारी तसेच गोंदिया जिल्हातील आमगाव विधानसभेतील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वच्या उपस्थित करण्यात आलेल्या चर्चा अंती लोकसभा निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने लढवावे असा एकमताने निर्धार करण्यात आला. या बैठकीला लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून शरद पवार यांनी निश्चिती केली असे जिल्हातीतल अहेरी चे आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य, गोंदिया जिल्हाध्यक्ष , जेष्ठ नेते बाबासाहेब वासाडे, युवक कार्याध्यक्ष नितीन भटारकर, महिला विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, चंद्रपूर महिला अध्यक्ष बेबी उईके, योगेश ना, कपिल बागडे, faim काजी, ग्यांकुमारी कौशिक तसेच लोकसभा शेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष, युवक जिल्हाअध्यक्ष, महिला अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, विधान सभा अध्यक्ष उपस्थित होते.

Previous articleआलापल्ली अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या-
Next articleमहा जनसंपर्क अभियानाअंतर्गत पोलीस महिला समुपदेशिका वैशाली बांबोळे यांचा सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here