Home गडचिरोली चामोर्शी बस स्थानकाचे बांधकाम गतीने पूर्ण करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

चामोर्शी बस स्थानकाचे बांधकाम गतीने पूर्ण करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

162

आशाताई बच्छाव

IMG-20230614-WA0034.jpg

चामोर्शी बस स्थानकाचे बांधकाम गतीने पूर्ण करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

अखेर चामोर्शी येथील बस स्थानकाचे ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री ना. एकनाथ जी शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

आमदार डॉक्टर देवरावजी होळी , खासदार अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चामोर्शी वासियांची बस स्थानकाची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली. चामोर्शी येथे प्रवाशांकरीता लवकरच भव्य असे बसस्थानक उभे राहणार असून या चामोर्शी बस स्थानकाचे बांधकाम गतीने पूर्ण करावे असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी बस स्थानकाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी केली.

मागील २ वेळा नियोजित ऑनलाइन भूमिपूजनाचा सोहळा रद्द झालेला असताना अखेर या बस स्थानकाच्या भूमिपूजनाला मुहूर्त प्राप्त झाला. आज राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते तर आमदार डॉक्टर देवरावजी होळी, खासदार अशोकजी नेते, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या बस स्थानकाच्या भूमिपूजनाचा ऑनलाईन सोहळा संपन्न झाला.

या भूमिपूजनाच्या प्रसंगी, खासदार अशोकजी नेते आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचेसह माजी जिल्हा परिषद सभापती तथा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे , चामोर्शीच्या नगराध्यक्षा सौ.जयश्रीताई वायलवार, आ.आघाडीचे प्रदेश महामंत्री प्रकाशजी गेडाम, चामोर्शी तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, , प्रतीक राठी यांचेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्यानं उपस्थित होते.

यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कंत्राटदारांना बस स्थानकाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला लागावे असे निर्देश आमदार डॉ देवरावजी होळी यांनी उपस्थित कंत्राटदार व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Previous articleनाशिकमध्ये हारुनभाई शेख यांच्या तत्परेतेमुळे झाली नालेसफाई
Next articleआलापल्ली अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या-
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.