Home Breaking News बहुजनांच्या न्याय हक्कासाठी विखुरलेल्या ओ.बि‌.सी. समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज –...

बहुजनांच्या न्याय हक्कासाठी विखुरलेल्या ओ.बि‌.सी. समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज – ज्योतीबा खराटे

125
0

बहुजनांच्या न्याय हक्कासाठी विखुरलेल्या ओ.बि‌.सी. समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज – ज्योतीबा खराटे

नांदेड, दि. ३ – राजेश एन भांगे

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा २८ वा वर्धापण दिन दि.1नोव्हें.रोजी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतीबा खराटे यांचे अध्यक्षतेखाली व सुभाष क्षीरसागर,नामदेव कातले,वसंत कपाटे,सुमित राठोड, समता परिषद यवतमाळचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव, अनिल रुणवाल,किशन राठोड,जिवन कोटरंगे,विलास मूनगिनवार, संतोष महल्ले या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या निमित्ताने बोलतांना ज्योतीबा खराटे यांनी बहुजनाच्या न्याय हक्कासाठी विखुरलेल्या ओबीसी समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज व्यक्त केली.
अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मराठवाडा मकरंद सावे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष सुनील बेहेरे यांनी दि.१- नोव्हें.रोजी पर्यटन विभागाच्या यात्री निवासच्या सभागृहात आयोजीत केलेल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे उदघाटन सुभाष क्षीरसागर यांनी केले.यावेळी समता सैनिक,गुणवंत विद्यार्थी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलतांना खराटे म्हणाले की, विविध जाती धर्मात विखुरलेल्या बहुजन ओ.बि‌.सी.समाजावर होणारे अन्याय/ अत्याचार रोखण्यासाठी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली ना.छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली.त्या माध्यमांतून तळागाळातील नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम अविरतपणे सुरू असून राज्यासह देशात ५२ टक्के असलेल्या ओ.बि.सी. समाजाची जनगणना होत नसल्याची बाब खेदजनक असल्याचे सांगून विविध जातीत विखुरलेल्या 348 जातीनी पोट जाती विसरून आपल्या मुला बाळाच्या भविष्यासाठी व आपल्याला न्याय हक्कासाठी वज्रमुठ बांधावीच लागणार असून संघटन मजबूत नसल्यामुळे अर्थिक दृष्ट्या हा समाज मागासलाच राहीला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपले संघटन मजबूत झाले नाही तर भविष्यात अठरा पगड जातीत विखुरलेल्या ओ.बी.सी.नां पारंपरिक धंद्या शिवाय पर्यायच उरणार नाही,त्यामु़ळे वेळीच विविध संघटनांनी एकोप्याने येऊन संघटन अधिक मजबूत करावे लागणार असल्याची गरजही खराटे यांनी व्यक्त केले.यावेळी आत्माराम जाधव व संतोष मह्ल्ले यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील बेहेरे यांनी केले. सुत्र संचलन प्रा. गुरनूले सर तर
आभार प्रदर्शन सुरेश गिर्हे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ.भा.माळी महासंघाचे प्रदेश संघटक कार्तिक बेहेरे,अ.भा.माळी महासंघाचे ता.अध्यक्ष बाळु ढगे,पवन मोरे,आनंद सोनूले,शिरीष बेहेरे,धिरज बेहेरे,सचिन बेहेरे, रिक्की बेहेरे यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous article*गणेश कॉलनीकडे* *पालिकाप्रशासनाचे दुर्लक्ष*
Next articleहसनाळ(.प. मू.)येथे तहसीलदार काशिनाथ पाटील यांचा पाहणी दौरा…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here