Home Breaking News *गणेश कॉलनीकडे* *पालिकाप्रशासनाचे दुर्लक्ष*

*गणेश कॉलनीकडे* *पालिकाप्रशासनाचे दुर्लक्ष*

95
0

*गणेश कॉलनीकडे* *पालिकाप्रशासनाचे दुर्लक्ष*

*युवा मराठा न्यूज*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरामधील गणेश काँलनीकडे जाणारा रस्ता, इथे गेल्या पाच वर्षांपासून वास्तव्यास रहिवासी राहत आहेत. तेथे साधा रोडही नाही, गटार पण नाही स्ट्रीट लाईट (ते काय असतं?) तर विषयच नाही. तेथे पुष्कळ घरं, अपार्टमेंट आहेत शिवाय एक निवासी आश्रम शाळा देखिल कित्येक वर्षांपासून आहे. दोन्ही बाजूंनी गटारीची गरज आहे.
पक्का (डांबरी) रोड आणि स्ट्रीट लाईट सहित सर्व सोयीसुविधा नगरपरिषदेने उपलब्ध करुन द्याव्यात , एक सुशिक्षित, सुजाण आणि सजग नागरिकाएवढा समजूतदारपणा नक्कीच येथील रहिवास्यांचा आहे. पण, रस्त्याच्या एका बाजूला चर काढून पाणी जायची व्यवस्था करून, मुरुम टाकुन लेव्हल करून घ्यावा , बांधकाम सुरू करण्यापूर्वी रीतसर सरकारी नियमांप्रमाणे रक्कम भरून बांधकाम करून गेली चार वर्षे नियमित घरफाळा भरत असताना एवढी माफक अपेक्षा तेथील रहिवास्यांची मागणी आहे. वेळोवेळी सरकार दरबारी लेखी तक्रार तसेच निवेदन सादर केले असुन ,आतातरी प्रशासन तसेच संबंधितांनी लक्ष घालून प्रश्नांकडे लक्ष द्यावे. प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवल्यास काहीही अशक्य नाही.

मोहन शिंदे कोल्हापूर
जिल्हाप्रतिनिधी .

Previous article*वयाच्या चौदाव्या वर्षी माझ्यावर* *लैंगिक अत्याचार झाले ,* *इरा खान*
Next articleबहुजनांच्या न्याय हक्कासाठी विखुरलेल्या ओ.बि‌.सी. समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज – ज्योतीबा खराटे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here