• Home
  • सोने महागले ; तेजी मागील हे आहे कारण

सोने महागले ; तेजी मागील हे आहे कारण

⭕सोने महागले ; तेजी मागील हे आहे कारण !⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

करोना विषाणूचा जगभर प्रकोप सुरू आहे. भारतात देखील करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जागतिक घडामोडींचा विचार करता अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील तणाव आता विकोपाला गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हाँगकाँग आणि चीनवर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होत आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती देत आहे.

जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव (Spot gold) ०.२ टक्क्याने वधारून १७३२.३८ डॉलर प्रती औंस झाला. तर अमेरिकेत मात्र सोने दरात ०.१ टक्के घसरण झाली आणि तो १७३३.५० डॉलर झाला. चांदीचा भाव प्रती औंस १७.३४ डॉलर असून त्यात ०.८ टक्के वाढ झाली आहे

आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) सोन्याचा भाव १३२ रुपयांनी वधारला. सध्या सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ४७१०५ रुपये आहे. कमॉडिटी एक्सचेंजमध्ये चांदी मात्र किलोमागे ६७० रुपयांनी महागली. चांदीचा भाव सध्या किलोला ४८९२७ रुपये आहे.

दरम्यान, देशातील सोने आयातीत डिसेंबर २०१९पासून घसरण सुरूच आहे. सोने आयात करणारा भारत हा जगातील आघाडीचा देश आहे. देशात दर वर्षी सुमारे ८०० ते ९०० टन सोन्याची आयात केली जाते. देशातील दागिन्यांची निर्यात एप्रिलमध्ये ९८.७४ टक्क्यांनी घसरून ३.६ कोटी डॉलरवर मर्यादित राहिली. आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये देशातील सोन्याची आयात १४.२३ टक्क्यांनी घटून २८.२ अब्ज डॉलरवर पोहोचली. हीच आयात २०१८-१९मध्ये ३२.९१ अब्ज डॉलरवर होती. सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या चालू खात्यावर मोठा बोजा टाकला जातो.

anews Banner

Leave A Comment