Home राजकीय ठाकरे सरकारला नारळ द्या! राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी

ठाकरे सरकारला नारळ द्या! राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी

105
0

⭕ठाकरे सरकारला नारळ द्या!
राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :- ‘ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी’, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली. हे सरकार लोकांचा जीव वाचवण्यास, उदरनिर्वाह करण्यास सक्षम नाही, असा हल्लाबोल राणेंनी केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. कोरोनामुळे राज्यावर गहिरं संकट आहे.
हे सरकार लोकांचे जीव वाचवू शकत नाही. कोरोना संकट हातळण्यात सरकार अपयशी ठरत आहे. या परिस्थितीचा विचार करून राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करावी. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्याने त्यांना परिस्थिती हाताळता येत नसल्याची टीका देखील नारायण राणे यांनी केली. नारायण राणे यांनी पुढे म्हटले की, आतापर्यंत राज्याला जे काही दिलंय ते केंद्र सरकारने दिलं आहे. एका तोंडानं राज्य सरकार केंद्राचं कौतुक करतं. दुसऱ्या तोंडानं टीका करतं. हे कोणत्या प्रकराचं राजकारण हे समजण्यापलिकडे आहे.

या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावेत, पोलिसांना कसे सुरक्षित ठेवावं याचा अभ्यास नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील विशेषत: मुंबईतील रुग्णालयं लष्कराच्या ताब्यात दिली तरच परिस्थिती सुधारेल, असं नारायण राणे म्हणाले…

Previous articleसोने महागले ; तेजी मागील हे आहे कारण
Next articleकेईएम रुग्णालयातील शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here