Home कोरोना ब्रेकिंग केईएम रुग्णालयातील शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ

केईएम रुग्णालयातील शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ

183
0

⭕ धक्कादायक ⭕
केईएम रुग्णालयातील शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. मुंबईतील कोरोनाचा गुणाकार हा कमी झाला असला तरी रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत कोरोनाची स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांनी केईएम रुग्णालयातील शवागृह भरले आहे. धक्कादाकय बाब म्हणजे शवागृहात मृतदेह ठेवण्यास जागा नसल्याने बाहेरच्या कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ, रुग्णालय प्रशासनावर आली आहे.

मुंबईतील महत्वाच्या रुग्णालयांपैकी केईएम रुग्णालय आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेतला येथे कोरोना बाधित रुग्ण जास्त येत आहेत. तसेच कोरोनाच्या विषाणूमुळे मृत्यू झाल्यांची संख्याही जास्त असल्याचे दिसून येत आहे.  २७ मृतदेह ठेवण्याची शवागृहाची क्षमता संपल्याने १० मृतदेह कॉरीडोरमध्ये ठेवण्याची वेळ मुंबई पालिकेच्या रुग्णालय प्रशासनावर आली आहे.

केईएम रुग्णालयात सध्या एकूण ३७ मृतदेह आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांत शवागृहातील सात कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शवागृहात आता कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. शवागृहात जागा कमी, रुग्णालयात कर्मचारी कमी या कात्रीत प्रशासन सापडल्याचे दिसून येत आहे…

Previous articleठाकरे सरकारला नारळ द्या! राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी
Next articleरेल्वेच्या निष्काळजीपणाचा पाढा सुरुच; ३४२ प्रवासी मजुरांना रस्त्यातच सोडलं
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here