Home Breaking News पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी पेठ वडगांव मतदान केंद्रावर चुरशीने मतदान,

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी पेठ वडगांव मतदान केंद्रावर चुरशीने मतदान,

167
0

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी पेठ वडगांव मतदान केंद्रावर चुरशीने मतदान,

पेठ वडगांव : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून पेठ वडगांव येथील बळवंतराव यादव हायस्कुल येथे शांततेत मतदानास सुरूवात झाली
असुन भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत असल्याने यावेळी चुरशीन मतदान होणार, मतदानाची टक्केवारी देखील वाढण्याची शक्यता आहे.
आज दुपारी १ वाजेपर्यंत ४० % वरती मतदान झाले होते .
यावेळी मतदान केंद्रावर वडगांव नगरपालिके मार्फत आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांचे थर्मल मशिनद्वारे तपासणी करून सँनिटायझर चा वापर करूनच मतदारांना प्रवेश दिला जात होता.
पुणे पदवीधर मतदारसंघ , शिक्षक मतदार मतदान करण्यासाठी श्री.शाहु शिक्षण प्रसारक मंडाळाच्या सचिव , व माजी.नगराध्यक्षा सौ.विद्याताई पोळ यांच्या उपस्थितीमध्ये श्री. बळवंतराव यादव हायस्कूल, मराठी शाखा, ज्युनियर कॉलेज, श्री विजयसिंह यादव महाविद्यालय, सावित्रीबाई फुले महिला अध्यापिका महाविद्यालय, कल्याणी पोळ इंग्लिश मीडियम स्कूल ,डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल मधील सर्व शिक्षक व पदवीधर स्टाफ सर्वांनी मिळून मतदानाचा हक्क बजावला .
तसेच श्री.शाहु शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी.पोलिस आयुक्त श्री.गुलाबराव पोळ साहेब यांनी देखील आपला मतदानाचा हक बजावला. यावेळी मतदान केंद्रावर हातकणंगले तालुक्याचे आमदार राजूबाबा आवळे , वडगांव शहर कांग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, शाहु शिक्षण संस्थेचे कार्यवाहक अभिजीत गायकवाड, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सचिव श्री.रघुनाथ पिसे, कोल्हापूर जिल्हा प्रवक्ता रणजीत पाटील , शिवसेनेचे नगरसेवक संदिप पाटील (बाबा) , तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरज जमादार राष्ट्रवादीचे फिरोज बागवान यांनी भेट दिली.

कोल्हापूर (युवा मराठा न्यूज नेटवर्क )

Previous articleसटाणा: शिखांचे धर्मगुरू गुरुनानक देव यांची जयंती उत्साहात साजरी
Next articleवारणा साखर कारखान्याचा २९५१ रू. पहिला हप्ता जमा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here