• Home
  • सटाणा: शिखांचे धर्मगुरू गुरुनानक देव यांची जयंती उत्साहात साजरी

सटाणा: शिखांचे धर्मगुरू गुरुनानक देव यांची जयंती उत्साहात साजरी

सटाणा: शिखांचे धर्मगुरू गुरुनानक देव यांची जयंती उत्साहात साजरी सटाणा,(जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– सटाणा शहरातील शिख बांधवांकडून येथिल ताहाराबाद नाक्यावर साजरी करून नानक यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनिल मोरे, मनमाड गुरुद्वाराचे संचालक बाबा रणजीतसिंह, चांदवड गुरुद्वाराचे बंटीसिंह, लालचंद सोनवणे, शिवसेना तालूका प्रमूख सुभाष नंदन, नगरसेवक महेश देवरे, दीपक पाकळे, बिंदूशेठ शर्मा, दत्तूभाऊ बैताडे, किरण मोरे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.

यावेळी बोलतांना बाबा रणजीतसिंह म्हणाले आज सर्वत्र सोशल मिडीया वापर मोठया प्रमाणात सुरू परंतू सोशल मिडीयावर चुकीच्या माहीती टाकून समाजामध्ये अफवा पसरवण्याचे काम अनेक समाजकंटकांडून सुरू आहे. अशा अफवांपासून प्रत्येकाने जागृत रहाण्याची गरज आहे.

यावेळी मोफत पाचशे मास्कचे वाटप उपस्थित पाहूण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाप्रसादही वाटप करण्यात आला. यावेळी राजनसिंह चौधरी, मंगलसिंह जोहरी,भरपूरसिंह पोथिवाल, टिंकू पोथिवाल,करणसिंह पोथिवाल, निटूसिंह भट्टी,भुरासिंह भट्टी, तरुणसिंह भट्टी, संदीपसिंह पोथिवाल, दर्शन पोथिवाल आदींसह महीला व पुरुष वर्ग उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment