• Home
  • 🛑 डिसेंबरमध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद, बँकांना सुट्याच सुट्ट्या 🛑

🛑 डिसेंबरमध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद, बँकांना सुट्याच सुट्ट्या 🛑

🛑 डिसेंबरमध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद, बँकांना सुट्याच सुट्ट्या 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 01 डिसेंबर : ⭕ वर्ष 2020च्या शेवटच्या महिन्यात बँकांना बर्‍याच सुट्ट्या मिळणार आहेत. जर आपली बँकेची काही कामे प्रलंबित असल्यास लवकरात लवकर ती उरकून घ्या. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरला एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे अनेक बँक ग्राहकांच्या कामावर यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशातील सर्व बँकांना ही 14 दिवसांची सुट्टी राहणार आहे. फक्त वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतील. काही राज्यांत, स्थानिक सणांच्या आधारे बँकांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात येईल.

बँकांच्या सुट्ट्या 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. 3 डिसेंबर रोजी कर्नाटक राज्यात कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियरची सुट्टी असेल. 3 डिसेंबरनंतर 6 तारखेला रविवारी असल्याने देशभरात बँकेची साप्ताहिक सुट्टी असेल. यानंतर 12 डिसेंबर हा डिसेंबरचा दुसरा शनिवार असल्याने बँकेत साप्ताहिक सुट्टी असेल. तसेच रविवारी 13 रोजी साप्ताहिक सुट्टी असेल.

गोव्यामध्ये 17 डिसेंबर रोजी लॉसोंग पर्व, 18 डिसेंबर रोजी पुण्यतिथी यू सो सो थम आणि 19 रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त सुट्टी असेल. यानंतर 20 तारखेला रविवार असल्याने बँकांना आठवड्याची साप्ताहिक सुट्टी असेल.

ख्रिसमसदेखील डिसेंबर महिन्यात दोन दिवस सुट्टी असेल. 24 डिसेंबर आणि 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असेल. तसेच 26 डिसेंबर रोजी महिन्याच्या चौथ्या शनिवारी साप्ताहिक सुट्टी असेल आणि 27 डिसेंबर रोजी रविवार असल्याने आठवड्याला सुट्टी असेल. दुसरीकडे 30 डिसेंबरला यू किअंग नंगबाह आणि 31 डिसेंबरला थर्टी फर्स्टची काही राज्यात सुट्टी असेल.⭕

anews Banner

Leave A Comment