Home मुंबई राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार..? चांगले गोष्ट आहे.. शरद पवारांची...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार..? चांगले गोष्ट आहे.. शरद पवारांची प्रतिक्रिया

83
0

आशाताई बच्छाव

20230706_212516-BlendCollage.jpg

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार..? चांगले गोष्ट आहे.. शरद पवारांची प्रतिक्रिया

ठाणे (अंकुश पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष दैनिक युवा मराठा न्युज चॅनल अँड पेपर)

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावर पवारांनी स्मित हास्य करत तीनच शब्दात आपली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी होऊन पक्षात उभी फूट पडली. यानंतर बदललेली राजकीय परिस्थिती पाहता राज्यात काही ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी आता तरी एकत्र यावं असे बॅनर लागलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे गुरुवारी (६ जुलै) मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू अभिजीत पानसे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेल्याची चर्चा रंगली. आता याबाबत दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावर पवारांनी स्मित हास्य करत तीनच शब्दात आपली प्रतिक्रिया दिली.अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा आहे. याबाबत महाराष्ट्रात होर्डिंगही लागत आहेत, असं लक्षात आणून देत शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार स्मित हास्य करत म्हणाले, “चांगली गोष्ट आहे.”

Previous articleकुकडहेटी येथील सहकारी संस्थेच्या संचालकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
Next articleशिक्षण धोरणात जलद सुधारणा करणे ही आजच्या काळाची मागणी आहे*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here