Home Breaking News वारणा साखर कारखान्याचा २९५१ रू. पहिला हप्ता जमा

वारणा साखर कारखान्याचा २९५१ रू. पहिला हप्ता जमा

470
0

पेठ वडगांव ता.१ : तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने २०२०-२०२१ या गळीत हंगामाची किफायतशीर किंमत ( एफ.आर.पी. ) प्रति टनास रुपये २ ९ ५१ याप्रमाणे संबंधित ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर जमा केली आहे . त्याचप्रमाणे तोडणी व वाहतूक कंत्राटदारांचे नविन वाढलेल्या दराप्रमाणे होणारी रक्कमही संबंधित तोडणी कंत्राटदार व वाहन मालक यांच्या खात्यावर जमा केली आहे अशी माहिती वारणा उद्योग समुहाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी दिली.
वारणा कारखान्याने गेल्या ऑफ सिझनमध्ये मशिनरीमध्ये काही तांत्रिक बदल केल्यामुळे कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने गळीत करत असून कारखान्याची तांत्रिक कार्यक्षमता अतिशय चांगली मिळत आहे . सरासरी साखर उतारा ११.१० टक्के इतका आला आहे . त्याप्रमाणे वाया जाणाऱ्या साखरेचे प्रमाण अतिशय नियंत्रणात आले आहे व साखरेची प्रतही उत्तमप्रकारे निघत आहे . कारखान्याचा वीज निर्मिती प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालू असून त्याचे व्यवस्थापनही वारणा कारखान्याकडे हस्तांतरित होत आहे . त्याप्रमाणे डिस्टीलरी प्रकल्पही प्रतिदिनी ७५००० लिटर ने चालू असून सिरपपासून इथेनॉल पुरवठ्याचे ९ २ लाख लिटरचे टेंडर मंजूर झाले असून गेल्या २० दिवसात ११ लाख लिटर इथेनॉल ऑईल कंपन्यांना पुरवठा पूर्ण केला आहे. सध्या प्रतिदिनी ७५००० लिटर तयार होणारे इथेनॉल ऑनलाईन डिलीव्हरी होत आहे . कारखान्याच्या व्यवस्थापनाने कारखाना मशिनरीची वाढविलेली तांत्रिक कार्यक्षमता, वाढलेली रिकव्हरी, साखरेच्या प्रतीमध्ये झालेली सुधारणा त्याचबरोबर व्यवस्थापन खर्च, व्याज खर्च , कामगार पगार खर्च, मटेरियल खरेदी या सर्वांमध्ये केलेली काटकसर याचा परिणाम कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारणेत झाला आहे. अतिशय अडचणीच्या काळात कारखाना कामकाजात झालेल्या सुधारणेमुळे आता कारखान्याचा वाईट काळ संपलेला आहे. येथुन पुढे सर्व ऊस उत्पादकांची ऊस बिले व तोडणी कंत्राटदार व वाहन मालकांची बिले वेळेवर दिली जातील. तरी सर्व ऊस उत्पादक सभासद, वाहतूकदार मालक व कारखान्याचे कामगार यांनी सहकार्य करुन सर्व ऊस आपल्या वारणा कारखान्याला द्यावा व कारखान्याचे १२.५० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेस सहकार्य करावे असे आवाहन डॉ. कोरे , उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक शहाजीराव भगत यांनी केले .
कोल्हापूर (युवा मराठा न्यूज)

Previous articleपुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी पेठ वडगांव मतदान केंद्रावर चुरशीने मतदान,
Next articleवारणानगरमधे नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेच्या वतीने दोन कॅन्सरग्रस्तांना दहा हजारांची मदत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here