Home Breaking News वारणानगरमधे नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेच्या वतीने दोन कॅन्सरग्रस्तांना दहा हजारांची मदत

वारणानगरमधे नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेच्या वतीने दोन कॅन्सरग्रस्तांना दहा हजारांची मदत

87
0

 

पेठ वडगांव ता.१: पन्हाळा तालुक्यातील वारणानगर मध्ये कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु केलेल्या “नो शेव्ह नोव्हेंबर” मोहिमेचा कॅन्सरग्रस्त कुटुंबांना मदत होत आहे. पुढील काळात या मोहिमेने व्यापक स्वरुप धारण करुन जास्तीत जास्त कॅन्सर ग्रस्तांना आर्थिक मदत करावी. असे आवाहन कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी येथे केले.
डॉ. अभिजीत जाधव यांच्या संकल्पनेतून “नो शेव्ह नोव्हेंबर कॅंपेन फॉर कॅन्सर पेशंट उपक्रमांतर्गत वारणा कॅन्सर फौंडेशननं केलेल्या आवाहनाला समाजातील दानशूरांनी चांगला प्रतिसाद दिला. मोहिमेचे दहावे वर्ष असून मोहिमेतून संकलित झालेल्या रक्कमेतून अशोक शिंदे(पारगांव), मंगल हिरवे(माले) या दोन गरजू कॅन्सर ग्रस्तांना कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे आणि कॅन्सर वर यशस्वीरित्या मात केलेले बहिरेवाडी गावचे महादेव सरनाईक यांच्या हस्ते प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. समाजामध्ये लोक आम्हाला वेगळ्या नजरेने बघतात,सापत्न वागणूक देतात.पण वारणा कॅन्सल फाउंडेशनने नो शेव्ह नोव्हेंबर च्या माध्यमातून समाजामधील ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचा आम्हाला आर्थिक फायदा पण झालेला आहे.याबद्दल आम्ही वारणा कॅन्सर फाऊंडेशनचे ऋणी आहोत. यावेळी
सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे शेजारी डॉ. अभिजीत जाधव,हिम्मत कुंभार , राजेंद्र जाधव, प्रथमेश पाटील,प्रविण पाटील, संदीप जाधव , राजकुमार जाधव, इत्यादी उपस्थित होते.
राजू जमदाडे यांनी आभार मानले.

कोल्हापूर (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

Previous articleवारणा साखर कारखान्याचा २९५१ रू. पहिला हप्ता जमा
Next articleमोकाट कुत्र्यांनी माकडाच्या पिलावर हल्ला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here