• Home
  • मोकाट कुत्र्यांनी माकडाच्या पिलावर हल्ला

मोकाट कुत्र्यांनी माकडाच्या पिलावर हल्ला

 

पेठ वडगांव शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्याची दुसरी घटना, कोल्हापूर रोडवरील हनुमान मंदीर परिसरात मोकाट कुत्र्यांनी माकडाच्या लहान पिलावर हल्ला केला . सदर पिलाला कुत्र्याच्या तावडीतून हनुमान मंदीर शेजारील शिवकुमार मिरजे , शुभम हंजे , जयदिप पाटील यांनी सुटका करून सुरक्षित स्थळी ठेवून मुक्या प्राण्याचा जिव वाचवला आहे.
सदर माकडाच्या पिलाला संदीप पाटील ,पुरूषोत्तम संकपाळ यांनी पशुवैद्यकिय अधिकारी डाँ. चिकबीरे यांच्या घरी नेऊन त्यांनी प्रथमोपचार करून जखमी माकडाच्या पिलाला नरंदे येथील वनविभागामधे वनपाल हजर नसल्यामुळे सदर जखमी  पिलाला कसबा बावडा येथील वनविभागाकडे देण्यात आले.
परवाच शेरीपार्क येथिल एका शेळीच्या पिलाचा कुत्यांनी हल्ला करून ठार केले होते.
सद्या शहरात मोका कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सदर वडगांव नगरपालिका प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेण्याची नितांत गरज आहे.
आज कुत्र्यांचा मुक्या प्राण्यावर हल्ला केला आहे कदाचित उद्या लहान मुलांनाही धोका निर्माण होणार आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment