• Home
  • मुखेड तालुक्यातील ईटग्याळ( प. मु) ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात.

मुखेड तालुक्यातील ईटग्याळ( प. मु) ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210106-WA0115.jpg

मुखेड तालुक्यातील ईटग्याळ( प.
मु) ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील ईटग्याळ (प. मु.)ग्रामपंचायतीवर शिवसेनेने सलग पाचव्यांदा भगवा फडकविला आहे. शिवसेनेचे बालाजी पाटील बनबरे यांची पाचव्यांदा बिनविरोध सरपंच पदी निवड झाली आहे. तर उपसरपंचपदी संदीप पाटील अतनूरे यांची निवड झाल्याबद्दल व इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीबद्दल शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनूर कर यांनी ईटग्याळ (प .मु .)येथील सरपंच उपसरपंच व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेड विधानसभा अध्यक्ष मनोज पाटील बनबरे गंगाधर पाटिल कोठारे रावसाहेब पा बनबरे राजकुमार पा अतनुरे विठ्ठल पा बनबरे उत्तम कांबळे सुनिल कांबळे राघोबा बनबरेअनिल पाटील अतनुरे गंगाधर पाटील बनबरे तंटामुक्ती अध्यक्ष मारोती पाटील कोटग्याले विश्वनाथ गायकवाड गणपत गायकवाड माधव पाटील कोठारे मारोती पाटील घन शेट्टी राजू पाटील बनबरे दिगंबर पाटील बनबरे मारोती पाटील बनबरे आदींची उपस्थिती होती. ईटग्याळ (प.मु.)ग्रामपंचायत सरपंच पदी बिनविरोध बालाजी पाटील बनबरे व उपसरपंच पदि संदिप पाटिल अतनुरे यांची निवड झाल्याबद्दल गावात व परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

anews Banner

Leave A Comment