Home माझं गाव माझं गा-हाणं अजमीर सौंदाणे येथे आज ग्रामपंचायतीच्या ऊपसरपंच पदी श्री स्वामी समर्थ ग्रामविकास पॅनलचे...

अजमीर सौंदाणे येथे आज ग्रामपंचायतीच्या ऊपसरपंच पदी श्री स्वामी समर्थ ग्रामविकास पॅनलचे श्री अर्जून पोपट माळी यांची बिनविरोध निवड

103
0

राजेंद्र पाटील राऊत

अजमीर सौंदाणे येथे आज ग्रामपंचायतीच्या ऊपसरपंच पदी श्री स्वामी समर्थ ग्रामविकास पॅनलचे श्री अर्जून पोपट माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच श्री धनंजय आनंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी श्री बी. एन. ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली ठरलेल्या रोटेशन पध्दतीने निवड प्रक्रीया पार पडली. त्यावेळी विरोधी गटाकडून कांतीलाल केदा मोरे व सत्ता धारी गटाकडून अर्जून पोपट माळी यांनी ऊमेदवारी अर्ज दाखल केले परंतू कांतीलाल मोरे यांनी शेवटच्या क्षणी निवड प्रक्रियेतून अर्ज माघारी घेतल्याने अर्जुन पोपट माळी(दुधमाळ) यांची ऊपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. त्याप्रसंगी पॅनलचे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र पाटोळे, वंदना मोरे, दिपक शेवाळे , दिपाली मगर, सपना नंदाळे, वंदना माळी,बाळू पवार आदि ऊपस्थित होते. माजी चेअरमन श्री प्रकाश जयसिंग मगर व राजेंद्र नारायण सोनवणे यांनी श्री अर्जून माळी यांचे अभिनंदन केले.त्याप्रसंगी सचिन सोनवणे,दिपक पवार, ज्ञानेश्वर नंदाळे, हिरामन पगार,महेश पगार,पोपट माळी, बारकु पवार, गोकुळ पवार, सुरेश माळी ,आदि ग्रामस्थ ऊपस्थित होते.    जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क सटाणा

Previous articleरायगड जिल्ह्यात नापास करण्याची धमकी देत शिक्षकाचा विद्यार्थ्यानीवर बलात्कार सर्वत्र तीव्र संताप….!
Next articleमुखेड तालुक्यातील ईटग्याळ( प. मु) ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here