Home मराठवाडा अंगावर वीज कोसळून एक जण जखमी जिंतूर तालुक्यतील कावी शिवारातील घटना

अंगावर वीज कोसळून एक जण जखमी जिंतूर तालुक्यतील कावी शिवारातील घटना

464
0

राजेंद्र पाटील राऊत

अंगावर वीज कोसळून एक जण जखमी

जिंतूर तालुक्यतील कावी शिवारातील घटना

जिंतूर ,(विष्णू डाखुरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
तालुक्यातील कावी शिवारात गुरे चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अंगावर विज कोसळल्याने जखमी झाल्याची घटना 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली असून जखमी तरुणावर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की तालुक्यातील कावी येथील शेतकरी राजाभाऊ पुंजाराम काठमोरे वय 25 वर्ष हे आपले गुरे चारण्यासाठी शेतात गेला असता दुपारच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे झाडाखाली उभा होता मात्र याच वेळी अचानक अंगावर वीज कोसळली यात तो तरुण जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तत्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी त्यांच्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here