Home परभणी परभणी पोलीस अधीक्षकांची अचानक सेलू पोलीस ठाण्यात भेट

परभणी पोलीस अधीक्षकांची अचानक सेलू पोलीस ठाण्यात भेट

111
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0033.jpg

परभणी पोलीस अधीक्षकांची अचानक सेलू पोलीस ठाण्यात भेट

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

परभणी :- पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी गुरुवारी दुपारी १ वाजता सेलू ठाण्यास अचानक भेट दिली. यानंतर तब्बल ६ तास पोलीस अधीक्षक यांनी ठाण्यात तपासणी केली. दरम्यान, अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्याची माहिती समजते.
गुरुवार १८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता पोलीस अधीक्षक जयंती मीना व इतर पोलीस अधिकारी यांचा ताफा सेलू ठाण्यात दाखल झाला. अचानक झालेल्या दौऱ्याने येथील कर्मचारी गोंधळून गेले. त्यानंतर पथकाने ठाण्यातील सर्व अभिलेखांची बारकाईने तपासणी केली. यामध्ये दाखल होत असलेल्या गुन्ह्याचे प्रमाण कमी करणे, दोषारोपपत्र ३० दिवसात पूर्ण करणे, याशिवाय आरोपींना अटक करणे, न्यायालयात हजर करतांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
याप्रसंगी मिसिंग व दुचाकी चोरी तक्रारी पाहता त्यांनी नाराजी व्यक्त केली. अचानक तपासणीत मात्र पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवार व इतर काही कर्मचारी तपासकामी मुंबईला गेले होते. इतर सर्व अधिकारी व कर्मचारी हजर होते. पोलीस अधीक्षक जयंत मीना हे सायंकाळी ७ वाजता परभणीकडे रवाना झाले.

Previous articleफोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांचा सत्कार
Next articleजे.टी.कासलीवाल इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी केला गोपालकाला- दहीहंडी उत्सव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here