Home नाशिक जे.टी.कासलीवाल इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी केला गोपालकाला- दहीहंडी उत्सव

जे.टी.कासलीवाल इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी केला गोपालकाला- दहीहंडी उत्सव

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0045.jpg

जे.टी.कासलीवाल इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी केला गोपालकाला- दहीहंडी उत्सव नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
नांदगाव येथील नावाजलेले जगन्नाथ ताराचंद कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्रागंणात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्सवात संपन्न झाला.श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी विद्यार्थ्यांनी समूह नृत्य,श्लोक पठन तसेच नृत्याविष्कारातून विविध श्रीकृष्णाच्या लिला सादर केल्या. श्रीकृष्ण व राधेच्या विविध वेशभूषेतील चिमूरड्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यावर ठेकाधरीत आपल्या नृत्यविष्काराची प्रचिती उपस्थित पालक व शिक्षकांना दिली. लहानग्या बालगोपालांनी मोठ्या जल्लोषात दहीहंडी फोडली तसेच आठवी नववीचे विद्यार्थी या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा ,प्रिन्सिपल मणी चावला उपस्थित होते. फोडलेल्या दहीहंडीतील प्रसाद गोपालकाला म्हणून सर्व विद्यार्थ्यांना वाटण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांना श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्ताने संस्थेचे चेअरमन सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबकाका कासलीवाल, महेंद्र भाऊ चांदीवाल,सर्व पदाधिकारी, प्रशासक गुप्ता प्रिन्सिपल मनी चावला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शैलेंद्र दामले,यांनी तर आभार प्रदर्शन रिटा उबाळे यांनी केले.

Previous articleपरभणी पोलीस अधीक्षकांची अचानक सेलू पोलीस ठाण्यात भेट
Next articleसापाचा आणि म्हशीच्या झुंजीत गाभण म्हशीला सर्पदंश डॉ.राहुल कांबळेनी वेळेत जाऊन ईलाज केल्यामुळे गाभण म्हशीला मिळाले जीवदान.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here