• Home
  • कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघाचे माजी उपाध्यक्ष कै.सिताराम शिंदे (समाजसेवक) हरपले 🛑

कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघाचे माजी उपाध्यक्ष कै.सिताराम शिंदे (समाजसेवक) हरपले 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210321-WA0034.jpg

🛑 कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघाचे माजी उपाध्यक्ष कै.सिताराम शिंदे (समाजसेवक) हरपले 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे:-⭕मोरणी गावचे प्रमुख व सोळागाव समुहाचे नेते कै. सितारामभाऊ शिंदे यांचे गुरुवार दिनांक १८/३/२०२१ रोजी दुर्देवी निधन झाल्याची बातमी मनाला चटका लावुन गेली.

त्यांच्या निधनाने सोळागाव समूह आज पोरका झाला आहे.मोरणी गावचे प्रथम सरपंच, कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघाचे माजी उपाध्यक्ष, अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष, सोळा गाव समाज समन्वयक व ज्येष्ठ समाजसेवक मोरणी सोळागाव समाज आणि कै. सिताराम भाऊ यांचे अतूट नाते जोडले गेले होते.

गतवर्षांचा कालखंडाचे अवलोकन केले तर याची चांगलीच प्रचिती येईल. सोळागाव समाजाचे श्री वाघजाई- महाकाली देवस्थानाच्या ऐतिहासिक परंपरेची कै.भाऊंना चांगली जाण होती.याबाबत त्यांचे विचार अतिशय प्रगल्भ तर होतेच परंतु मार्गदर्शकही होते , त्यामुळे देविचे दैविक उत्सव पद्धतशीर पार पाडले जात. देवस्थानाच्या ऐतिहासिक परंपरेबाबत आम्ही इतर सर्व अनभिज्ञच होतो.श्री.भाऊंचा जन्म इ.स.१९३९ मध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मोरणी गावातच झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेत झाले असावे.त्याकाळी मोरणी येथील सोळागाव समुहाच्या वाघजाई-महाकाली मंदिरात,सोळागाव समाजाच्या विविध विषयांवर बैठका होत असत.

शिवाय श्री वाघजाई- महाकाली मंदिरात फाल्गुन शुक्ल त्रयोदशी रोजी भव्य जत्रा भरत असे. त्या यात्रेसाठी सोळागावातुन देव-देवतांच्या पालख्या व भव्य समाज येत असे. त्यामुळे कदाचित कै. भाऊंना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली असावी. लहान वयातच त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली.कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या निर्मितीमुळे , कोयना व कांदाटी खोऱ्यातील जवळ जवळ ९८ गावांना १९६२ मध्ये पुनर्वसन करावे लागले. त्यात सोळागाव समूहाचाही समावेश होता. त्यावेळी भाऊंचे वय फारतर २२ ते २३ असेल . एवढ्या लहान वयात सुद्धा त्यांचेकडे अप्रतिम सामाजिक जाण होती.त्यांनी मोरणी या त्यांच्या गावाचे पुनर्वसन इतर गावांच्या बरोबर, ठाणे जिल्ह्यातील चिंचवली हद्दीत केले.

पुनर्वसना नंतर गावात सामाजिक ऐक्य ,सह्याद्रीच्याकड्या-कपारीतील संस्कृती अबाधित राखली. त्यांचे वक्तृत्व उत्तम असल्याने व बोलण्यात स्पष्टता असल्याने , त्यांच्या बोलण्याची छाप इतरांवर सहजगत्या पडवयाची.त्यांच्या आवाजात कारारीपणा होता, परंतु त्यांचे अंतरमन अतिशय मृदू होते.

कै.भाऊंच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळा आहेच , परंतु सोळागावांचा आधारवड हरपल्याने अप्रतिम नुकसान झाले आहे .त्यांच्या कुटूंबियांनी दुःखातुन लवकर बाहेर पडावे अशी आम्ही इश्वराजवळ प्रार्थना करतो.सुरेश(नाना)मोरे आणि (सोळा गाव सन्मिय समिती ठाणे जिल्हा)…⭕

anews Banner

Leave A Comment