Home भंडारा ‘ युद्ध नको,जगाला बुद्ध हवा ‘ अशी शिकवण देणारे म्हणजे डॉ बाबासाहेब...

‘ युद्ध नको,जगाला बुद्ध हवा ‘ अशी शिकवण देणारे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर: राहुल डोंगरे ( शारदा विद्यालय येथे प्रतिपादन )

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20231207_084253.jpg

‘ युद्ध नको,जगाला बुद्ध हवा ‘ अशी शिकवण देणारे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर: राहुल डोंगरे
( शारदा विद्यालय येथे प्रतिपादन )

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी:)बोधिसत्व,डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महान द्रष्टे नेते व युगपुरूष होते.समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय असे आहे.अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करत त्यांनी देशात व परदेशात शिक्षण घेतले.शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश भारतीय समाजाला दिला.’ युद्ध नको, जगाला बुद्ध हवा ‘ अशी शिकवण देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच होते,असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.ते शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन अभिवादन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वासुदेव चरडे होते.सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.राम बोपचे, लिझा हेडाऊ,विपसी बागडे,कादंबरी वैद्य,सृष्टी मोहतूरे,अमन सोनवाणे यांनी ‘ सहा डिसेंबर छेप्पन साली,वेळ कशी ती हेरली,दुष्ट काळाने भिमरायाची काळज्योत ती चोरली ” या सामूहिक गीतातून अभिवादन केले.अमन सोनवाणे ,सृष्टी मोहतूरे,कादंबरी वैद्य,विपसी बागडे,राम बोपचे, लिझा हेडावू यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,धार्मिक पैलूवर विचार व्यक्त केले. प्रमुख अतिथी वासू चरडे यांनी “भिमराया कधी येशी भेटावया,जन्म घे तू पुन्हा हे महामानवा’ या गीतातून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून श्रद्धांजली वाहिली.
प्रमुख वक्ते राहुल डोंगरे पुढे म्हणाले की, बुद्धिसम्राट डॉ बाबासाहेब आंबेडकर हे थोर सामाजिक क्रांतिकारक होते.भारतातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान न्याय व हक्क मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेब आग्रही होते.त्यांनी त्यासाठी भारतीय राज्यघटनेत विविध तरतुदी केल्या.त्यामुळेच आज महिलांना सर्वच क्षेत्रात प्रगती,उन्नती आणि विकासाच्या चौफेर संधी उपलब्ध होत आहेत.राष्ट्रीय प्रेमाने झपाटलेल्या या प्रज्ञासुर्यास,सच्चे लोकशाहीवादी,प्रखर विज्ञाननिष्ठ दीपस्तंभाचे भारतीयांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे.तरच खरे राष्ट्रहित जोपासता येईल,असे परघड मत यावेळी व्यक्त केले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेत विभोर निखाडे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमाचे संचालन कु. यशस्वी नवखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. श्रावणी मोहतुरे यांनी केले.पूजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाबिरप्रसाद आग्रवाल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.रूपा रामटेके,प्रा.माधवी खोब्रागडे,प्रा.नवीन मलेवार , नितुवर्षा घटारे,प्रीती भोयर,सीमा मेश्राम,संजय बावनकर,श्रीराम शेंडे,अशोक खंगार, रुपराम हरडे,प्रशांत जीवतोडे, अंकलेष तिजारे,नलिनी देशमुख,नारायण मोहनकर, झंकेश्वरी सोनेवाणे यांनी सहकार्य केले.

Previous articleशेतकऱ्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे विमा कंपनीकडून पिक विमा नुकसान देऊन धान खरेदी केंद्र सुरू करा
Next articleतुपकर मुरमाडी येथे भरड धान्य महोत्सवाचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here