Home युवा मराठा विशेष तुम्ही कधी बघितले आहे का? कलियुगात प्रत्यक्ष देवच पितो दारु!

तुम्ही कधी बघितले आहे का? कलियुगात प्रत्यक्ष देवच पितो दारु!

70
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220604-083652_Google.jpg

तुम्ही कधी बघितले आहे का? कलियुगात प्रत्यक्ष देवच पितो दारु!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
उज्जैन– तुम्ही कधी बघितले आहे का? अगदी तुमचाही विश्वास बसणार नाही,अशीही घटना आहे.कलियुगात देवाची मुर्तीच चक्क पितेय दारु…थोडीथाडकी नव्हे…तर दररोज कैक हजारो लिटर दारु पिणारी देवाची मुर्ती आपल्याच देशात आहे.
मध्यप्रदेशातील इंन्दौरपासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या उज्जैन शहरातील ही सत्यघटना आहे.उज्जैन शहर तसे राजा विक्रमादित्य यांच्या राजधानी मुळे प्रसिध्द आहे.अगदी तसेच बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वर महादेव मंदीरामुळे अतिप्रसिध्द आहे.शिप्रा नदीच्या काठावर वसलेल्या या उज्जैन नगरीत एक अचंबीत करणारी…व कलियुगातील प्रत्येकाच आव्हान देणारी चमत्कारिक घटना भैरवगड मध्ये दिसून येते.उज्जैनपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर भैरवगड हे स्थान असून,तेथेच अतिप्राचीन व सुप्रसिद्ध कालभैरवनाथाचे देवालय आहे.शेजारी पाताल भैरवीची गुंफा (भुयार) सुध्दा आहे.अशा या भैरवगडमध्ये इतर ठिकाणी मंदिराजवळ असलेल्या हार फुलांच्या नारळ उदबतीच्या दुकानाप्रमाणे काहीही नसून,सर्वत्र फक्त दारुचीच दुकाने आहेत.तेथून दारु विकत घेतल्यानंतर कालभैरवनाथाच्या मुर्तीला ती दारु पाजायची असते.संपूर्णपणे पाषाणाची असलेली ही मुर्ती काही क्षणातच संपूर्ण दारु प्राशन करते.हाच कलियुगातील मोठा अजब गजब चमत्कार आहे.विदेशी संशोधकानी देखील ही मुर्ती खरंच दारु पिते का?दारु पिल्यानंतर ही दारु नेमकी कोठे जाते.याचा काहीच उलगडा झालेला नाही.एक मात्र खरे की,खुलेआम दारु विक्री करणारे तेसुध्दा मंदिराबाहेर शेकडोंनी दुकाने लावून देवाचा प्रसाद म्हणून विक्री करणारे दारु व्यावसायिक देखील प्रशासनाला मोठ्ठेच आव्हान दाखवितात म्हणजे हे विशेष!
(टिप-आम्हांला या बातमीव्दारे कुठलीही अंधश्रध्दा वाढविण्याचा उद्देश किंवा हेतू नसून;सबब आपल्याही देशात असे काही मंदीरे आहेत की,आश्चर्य वाटते म्हणूनच ही बातमी प्रसारीत केली आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here