Home मुंबई आर्यनची सुटका नाहीच..? जामीनाविरोधात एनसीबी सर्वोच्च न्यायालयात जाणार..! उज्ज्वल निकम 🛑

आर्यनची सुटका नाहीच..? जामीनाविरोधात एनसीबी सर्वोच्च न्यायालयात जाणार..! उज्ज्वल निकम 🛑

117
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 आर्यनची सुटका नाहीच..? जामीनाविरोधात एनसीबी सर्वोच्च न्यायालयात जाणार..! उज्ज्वल निकम 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :-⭕मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवरील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात तीन दिवस झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने गुरुवारी आर्यनची जामीन याचिका मंजूर केली. मात्र, यादरम्यान आर्यनची जामीन याचिका रद्द करण्यासाठी एनसीबीला सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे, असे ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटले की, ‘साखळी न्यायव्यस्थेत खालच्या स्तरावरील न्यायालयाचा निर्णय मान्य नसेल तर उच्च न्यायालयात अर्ज करता येऊ शकते.

तसेच उच्च न्यायालयाचा निर्णयही मान्य नसेल तर सर्वोच्य न्यायालयात अर्ज दाखल करता येते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अंतिम निकाल असतो. आणि हा निर्णय सर्वांना मान्य करावाच लागतो’.
‘आर्यन खानच्या प्रकरणात एनसीबीने सत्र न्यायालात आर्यनविरोधात व्हॉट्सअप चॅटचा पुरावा दिला. त्यामुळे तेथे आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे आर्यनमार्फत उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल करण्यात आली.

तर एनसीबीतर्फे आर्यनविरोधात उच्च न्यायालयातही हेच पुरावे दाखवण्यात आले. मात्र, यावेळी आर्यनच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आणि त्यामुळे आर्यनची जामीन याचिका न्यायलयाने मंजूर केली’.
आता एनसीबीचा तपास अद्याप सुरु आहे.

त्यामुळे अजून सबळ पुरावे गोळा करून एनसीबी आर्यनच्या जामीनविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करू शकत्ते. कायद्याने त्यांना ही तरतूद आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात जावे किंवा नाही, हा सर्वस्वी एनसीबीचा प्रश्न आहे, असेही निकम यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here