Home सामाजिक गुलबर्गा महानगरपालिका आणि झोपडपट्टी निर्मूलन मंडळात राजीव गांधी आवास योजनेअंतर्गत दिवसाढवळ्या भ्रष्टाचार...

गुलबर्गा महानगरपालिका आणि झोपडपट्टी निर्मूलन मंडळात राजीव गांधी आवास योजनेअंतर्गत दिवसाढवळ्या भ्रष्टाचार उघडकीस..!!

198
0

राजेंद्र पाटील राऊत

गुलबर्गा महानगरपालिका आणि झोपडपट्टी निर्मूलन मंडळात राजीव गांधी आवास योजनेअंतर्गत दिवसाढवळ्या भ्रष्टाचार उघडकीस..!!
गुलबर्गा,(यशवंतराव सुर्यवंशी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-गुलबर्गा महानगरपालिका आणि झोपडपट्टी निर्मूलन मंडळाच्या वतीने कर्नाटक सरकारच्या योजनेतून गुलबर्गा शहरातील जाफराबाद सर्व्ह नंबर २१/१ मध्ये ७०४ घरे निराश्रीत लोकांसाठी निर्माण करुन देण्यात आली आहेत. परंतु या योजनेमध्ये नियमानुसार ज्यांना घरे मिळावीत अशांना ती घरे न मिळता सदरील घरे हि राजकारणातील आमदार खासदार यांचे कार्यकर्ते व पुढारी श्रीमंताना सरकारी नोकरदार कुटूंबांना एकाच वेळी दोन दोन घरे देण्यात आलेली आहेत.नियमानुसार झोपडपट्टीत कमीत कमी पाच वर्षे ते कुटूंब वास्तव्यास असावे.परंतु संबंधित अधिकारी कुठलेच सरकारी नियम न पाळता मनमानी कारभाराप्रमाणे पाहिजे त्या व्यक्तीस हि घरे वाटण्यात आली आहेत.
निराश्रीत व गरजू लोकांना हि घरे मिळू शकलेली नाहीत असे दुःख येथील झोपडपट्टीवासिय व्यक्त करीत आहेत.
त्याकरीता शहरातील दक्ष अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून जे बेघर,निराश्रीत झोपडवासियांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे,तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात यावी अशीही मागणी येथील अहिंद चिंतक संघटनेतील राज्यध्यक्ष सायबण्णा जमादार,पदाधिकारी संजू होडलकर,रमेश हडपद,प्रकाश पट्टेवार,मल्लिकार्जून कोडली,श्रीनिवास गुतेवार,विजयकुमार स्वामी,नारायण दुडदाळ व असंख्य बेघर व निराश्रीत लोकांच्या वतीने कार्यालयासमोर घेराव घालून प्रदर्शन करण्यात करण्यात आले.

Previous articleशेतकऱ्यांसाठी आपला लढा निरंतर सुरूच राहील” डिक्कर..
Next articleआर्यनची सुटका नाहीच..? जामीनाविरोधात एनसीबी सर्वोच्च न्यायालयात जाणार..! उज्ज्वल निकम 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here