Home विदर्भ शेतकऱ्यांसाठी आपला लढा निरंतर सुरूच राहील” डिक्कर..

शेतकऱ्यांसाठी आपला लढा निरंतर सुरूच राहील” डिक्कर..

154
0

राजेंद्र पाटील राऊत

शेतकऱ्यांसाठी आपला लढा निरंतर सुरूच राहील” डिक्कर..
ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख / सतिश पाटील यूवा मराठा न्यूज
जळगाव (जामोद):

आपण शेतकऱ्यांसाठी प्रांजळपणे धडपड करतो. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे .

ह्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा पिक विमा चा प्रश्न असो, कर्जमाफी चा प्रश्न असो, विजबिलाचा प्रश्‍न असो यासाठी आपला लढा हा सातत्याने निरंतर सुरू आहे. ह्या मतदारसंघातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. तसेच महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून शंभर टक्के शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या आणि चालू आर्थिक वर्षातील पिक विमा सुद्धा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करा, अशा स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. कुत्र्यासारखे शंभर दिवसाचे जीवन जगण्यापेक्षा वाघा सारखे दहा दिवसाचे जीवन जगणे कधीही चांगले आहे ,आपण आपल्या रक्ताचा अखेरचा थेंब शिल्लक असे पर्यंत शेतकऱ्यांसाठी निरंतर आपला लढा लढत राहू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केले.

दिनांक 29 ऑक्टोबर रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येत आलेल्या शेतकरी शेतमजुरांच्या संताप मोर्चा शेतकऱ्यांसमोर बोलत होते .स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा कु. पुजा मोरे, स्वाभिमानीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, स्वाभिमानीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे,बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर यांचीही यावेळी मंचकावर उपस्थिती होती .
स्थानिक आमदाराला शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे काहीही घेणे देणे नाही ,असे सांगून जिगाव प्रकल्प असो ,इस्लामपूर प्रकल्प असो,संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड आणि आर नदी प्रकल्प असो किंवा 140 गाव पाणीपुरवठा योजना असो यांनी प्रत्येक शासकीय योजनेतून आपल्या स्वार्थ साधला

काही मंडळातील सुटलेला पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले म्हणून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला प्रतिहेक्‍टरी 50 हजार रुपये मदत तात्काळ द्या, चालू वर्षी चा पिक विमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळावा आणि वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करावी त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून शंभर टक्के कर्ज माफी द्या अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीचे विदर्भ युवा अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचे नेतृत्वात जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती पासून हजारो शेतकऱ्यांचा संताप मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. ह्या मोर्च्याला जळगाव संग्रामपूर तालुक्यातून हजाराच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर यांची उपस्थिती होती.

Previous articleअजमीर सौंदाणेत शेतकऱ्यांची आत्महत्या
Next articleगुलबर्गा महानगरपालिका आणि झोपडपट्टी निर्मूलन मंडळात राजीव गांधी आवास योजनेअंतर्गत दिवसाढवळ्या भ्रष्टाचार उघडकीस..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here