Home नांदेड देगलूर तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा ‘च्या माध्यमातून भाजपची पोलखोल.

देगलूर तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा ‘च्या माध्यमातून भाजपची पोलखोल.

83
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231019-204744_WhatsApp.jpg

देगलूर तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा ‘च्या माध्यमातून भाजपची पोलखोल.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार केंद्रातील भाजप सरकारने दिलेल्या खोट्या अश्वासनाची पोलखोल करण्यासाठी होऊ द्या चर्चा पंधरवाडा मोहीम हाती घेण्यात आली,शिवसेनेच्या वतीने आयोजित होऊ द्या चर्चा हा भाजपच्या 2014 वर्षी पंतप्रधान मोदीनी लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्ज माफी, शेतीमालाला भाव, बेरोजगारांना रोजगार, मराठा, धनगर समाजाला आरक्षण, अच्छेदिनाचे स्वप्न,प्रतेकाच्या15 लाख खात्यात जमा होणार असल्याची दिशाभूल, महागाई कमी करण्याचे आश्वासन, सब का साथ सब का विकास, कालधन वापसी, भ्रष्टाचार बंद आदीसह असंख्य बोलघेवड्या पोकळ फसव्या घोषणा भांडाफोड करण्यासाठी देगलूर तालुक्यातील लख्खा , मुजळगा, चाकुर , बल्लूर येथे जाहीर कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शिवसेना विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख माश्री संदीप महीदा मुंबईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर शिवसेना शहर समन्वयक विनोद सोनकांबळे, लख्खा येथील सरपंच , चेअरमन सुरेश पाटील मुंडकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख अमोल जगन्नाथ पाटील मुंडकर, उपविभाग प्रमुख हाणमंत राजुरे, अल्पसंख्याक सेनेचे उपाध्यक्ष बाबा खान पठाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारोतराव उचकलवार मुजळगा येथे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष इंजिनिअर गजानन पाटील मुजळगेकर, दिनानाथ पाटील,सरपंच उल्लेवार , विभाग प्रमुख राजु उल्लेवार, शाखाप्रमुख राम पाटील, चाकुर येथे सरपंच राजुरे, युवा सेना उपतालुकाप्रमुख राम राजुरे, विभाग प्रमुख गंगाधर पाटील चाकूरकर आदी मान्यवरासह वरील गावातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते यावेळी प्रत्येक गावात सत्कार करण्यात आला तर लख्खा येथे वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here