Home जळगाव टोळीने गुन्हे करणारे चाळीसगावचे चौघे जिल्ह्यातून हद्दपार

टोळीने गुन्हे करणारे चाळीसगावचे चौघे जिल्ह्यातून हद्दपार

282

आशाताई बच्छाव

20230924_195647-BlendCollage.jpg

टोळीने गुन्हे करणारे चाळीसगावचे चौघे जिल्ह्यातून हद्दपार
चाळीसगाव,(प्रतिनिधी विजय पाटील)-चाळीसगाव शहरात टोळीने गुन्हे करणारे चोेेेेंग्या व भूप्यासह चौघा गुन्हेगारांना दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा हद्दपारीचा आदेश काढला आहे. या काररवाईने गुन्हेगारी वर्तुळात एकच हडकंप माजला आहे.
घटनेची माहिती अशी की, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील हद्दपार प्रस्ताव क्र. 07/2023 मधील भुपेश ऊर्फ भुप्या यशवंत सानेवणे(23) रा. भडगांव रोड, आर. के. लॉन्स जवळ चाळीसगांव, अभय उर्फ अभ्या हिम्मत लोहार(19) रा. प्लॉट एरीया चाळीसगांव, धनंजय उर्फ धन्या बाळासाहेब भोसले(25)रा. स्वामी समर्थनगर चाळीसगांव व चोंग्या उर्फ तुषार महेंद्र जाधव(26) रा. नारायणवाडी पेट्रोलपंप जवळ चाळीसगावं यांचे विरुध्द चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे त्यांनी संघटीतपणे केले आहेत.
या चौघांचा हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचे कडेस आल्यानंतर प्रस्तावाची सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी चौकशी केली. त्यात ते जिल्हयांतुन हद्दपार करण्याचे किंवा वारंवार गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याचे निष्पन्न झाल्याने या चौघांना दोन वर्षाकरीता जळगांव जिल्हयातुन हददपार करण्यात आले आहेत.
विविध गुन्ह्यांची नांेंद असलेल्या या चौघांनी टोळीने राहुन चाळीसगाव शहरात ठिक ठिकाणी दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला होता. जिल्ह्यात शांतता ठेवण्याबाबत त्यांचेविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नव्हती. त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झाल्याने अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार विनोद भोई, पोना. तुकाराम चव्हाण, पो.कॉ. चतरसिंग महेर, मपोकॉ. सबा शेख यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता.पोलीस अधीक्षकांनी चौकशीअंती चौघांचे हद्दपारीचे फर्मान काढले.
या हद्दपार प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे पेालीस निरीक्षक किसन नजन पाटील व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार एएसआय युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनिल दामोदरे यांनी पाहिले.

Previous articleप्रहार पक्ष युवा आघाडी ने केला मुलीचा आगळावेगळा वाढदिवस साजरा
Next articleदेवळा मर्चंट को.आँपरेटिव्ह बँकेची सर्वसाधरण सभा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.